ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

चेनापुर येथे माता जगदंबा देवी यात्रेनिमित्त भव्य कुस्तीची दंगल

अर्धापूर तालुक्यातील चेनापुर या गावी चैत्र पौर्णिमेनिमित्त जगदंबा देवी यात्रेनिमित्य भव्य कुस्तीचे दंगल भरवली जाते गावातील नागरिक मानकरी सरपंच ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने माता जगदंबा देवीची पूजा आरती करून
कुस्ती खेळण्यासाठी सुरूवात करण्यात आली
अनेक राज्यातुन व जिल्ह्यातून या ठिकाणी तालमीतील महिला पैलवान व पुरुष पैलवान आपला कुस्ती खेळ खेळण्यासाठी या ठिकाणी येतात दोन्ही आलेल्या महिला पैलवानानी पुरुष पैलवानांना पराभुत करुन विजयी होताच नागरिकांनी टाळ्या चार वर्षाव केला.
शेकडो वर्षापासून या गावी जत्रा भरवली जाते. माता जगदंबा देवीच्या मंदिरात बारस एकादशीनिमित्त नऊ दिवस काकन बसवले जाते. या गावाचा असा अनोखा इतिहास आहे नऊ दिवस गावात शेत जमीनीत मशागत केली जात नाही
नऊ दिवस बैलाला बसून ठेवले जाते त्यांच्या खांद्यावर जु ठेवला जात नाही. अशा अनोख्या रूढी परंपरा या गावात सगळ्या वेगळ्या पाळल्या जातात
शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे

यावेळी उपस्थित गावातील
प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व नागरिकांच्या वतीने ही यात्रा भरवली जाते.