नांदेड शहरात पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन
नांदेड मनोज मनपुर्वे
नांदेड शहरातील बबनपुरा भागातील रहिवाशांनी शोले स्टाईल आंदोलन केले. मागील दोन महिन्यापासून मगनपुरा भागात तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीये. त्यामुळे मगनपुरा भागातील रहिवाशांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून शहरातील मगनपुरा भागात नळाला पाणी न आलेल्या संतापलेल्या नागरिकांनी चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले आहे. महानगरपालिकेचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पाणी देण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.