पुणे पोलिसांच्या हातावर तुरी; आरोपी ससून रुग्णालयातून पळाला
पुणे: पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष सचिन साठे असं ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी साठे याच्याविरोधात कराड पोलीस स्थानकामध्ये 354 अन्वे गुन्हा दाखल आहे. साठे याच्यावर सध्या पुण्याच्या असून रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना पोलिसांचा देखदेखीखाली असलेला साठे सकाळी ससून रुग्णालयातून पळाला, याप्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

याआधी पळालेला ललित पाटील
ड्रग्स माफिया ललित (Pune Crime News) पाटील 2023 मध्ये पुण्यातील ससूनमधून पळून गेला होता. त्यानंतर देखील पुणे पोलिस आणि प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले होते, या प्रकरणी कारवाई देखील झाली होती. तरीदेखील आरोपी पळून जाणं सुरूच असल्याचं दिसत आहे. आता देखील पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी देखील या ठिकाणी उपचार सुरू असणारे आरोपी पळून गेल्याची माहिती आहे.
पुण्यासह कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातले कुख्यात गुन्हेगार येरवाडा कारागृहात ठेवले जातात. त्यांना वैद्यकीय तक्रारी असतील तर त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार केले जातात. पण या सुविधेचा गुन्हेगार गैरवापर करत असल्याच आढळून आलं आहे. या ठिकाणी उपचार सुरू असताना तो पळून गेल्याची माहिती आहे.