हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
उन्हाळी पिके,आंबा, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचे नुकसान
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह हिमायतनगर तालुक्यातील अनेक भागात गारपीट झालीय. या अवकाळी पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील उन्हाळी पिके,आंबा ज्वारी,फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.