• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, काय आहे या दिवसाचे महत्त्व

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
November 5, 2021
in राज्य, सामाजिक
0
आज छोटी दिवाळी, उद्या लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, जाणून घ्या दिवाळीचे शुभ मुहूर्त

ऑनलाइन टुडे महाराष्ट्र

दिवाळीची सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

पौराणिक महत्त्व असलेल्या आणि कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवाळी पाडव्याचा सण शेतकरी राजा मोठ्या उत्साहाने साजरा करतो. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.

आज 5 नोव्हेंबर शुक्रवारी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आहे. कोरोनाचा काळ असला तरी यंदा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. या दिवशी खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी सोने, गाड्या किंवा संपत्तीची खरेदी केली जाते.

काय आहे कथा
बलिप्रतिपदेच्या विषयी अशी कथा सांगितली जाते की, पार्वतीने शंभू महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी भगवान विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले.

असं सांगितलं जातं की, बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.

Previous Post

कोरोना लसीकरणाबाबत औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा निर्णय.., काही कडक निर्बंध लागू

Next Post

विषारी दारू प्यायल्याने गेल्या २४ तासांत १८ जणांचा मृत्यू

Next Post
विषारी दारू प्यायल्याने गेल्या २४ तासांत १८ जणांचा मृत्यू

विषारी दारू प्यायल्याने गेल्या २४ तासांत १८ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनिल परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानी ईडीची छापेमारी 
राज्य

अनिल परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानी ईडीची छापेमारी 

  ऑनलाईन टुडे महाराष्ट्र- शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी...

by Today महाराष्ट्र
May 26, 2022
संत भीमा भोई यांच्या या वाक्याच्या माध्यमातून मिळते काम करण्याची ऊर्जा – प्रतापराव पाटील
सामाजिक

संत भीमा भोई यांच्या या वाक्याच्या माध्यमातून मिळते काम करण्याची ऊर्जा – प्रतापराव पाटील

  पाळधी: भोई समाजाचे आराध्य दैवत संत भीमा भोई यांची १७२ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. जि.प.सदस्य प्रतापराव पाटील...

by Today महाराष्ट्र
May 25, 2022
जळगाव

पाळधी विकास सोसायटीवर शिवसेनेच्या सर्व जागा बिनविरोध

    पाळधी ता धरणगाव- येथील विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनमोल सहकार्याने चेअरमन व व्हाईस...

by Today महाराष्ट्र
May 24, 2022
मोबाइल स्क्रीनवर नाव दर्शविणारे true caller ची गरज भविष्यात नाही, ट्राय करीत आहे नवे तंत्रज्ञान
करियर

मोबाइल स्क्रीनवर नाव दर्शविणारे true caller ची गरज भविष्यात नाही, ट्राय करीत आहे नवे तंत्रज्ञान

मोबाइल स्क्रीनवर नाव दर्शविणारे true caller ची गरज भविष्यात नाही, ट्राय करीत आहे नवे तंत्रज्ञान   नवी दिल्ली: दूरध्वनी करणाऱ्याचे...

by Today महाराष्ट्र
May 21, 2022
  • Home
  • Sample Page

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group