पाळधी ता. धरणगाव- येथे जिल्ह्यातील सर्व अर्धसैनिक बलाच्या जवानांच्या सीएपीएफ संघटनेचे महत्त्वपूर्ण बैठक शनिवार 18 डिसेंबर रोजी पाळधी तालुका धरणगाव येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. बैठकीत दिल्ली येथील कोअर कमिटी सदस्य उपस्थित राहतील. तसेच प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील,आ. सुरेश भोळे अँड. जमील देशपांडे व्ही. के .शर्मा हे राहतील.
जिल्ह्यातील सर्व अर्ध सैनिक बलाच्या जवानांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक विजय सपकाळे ,बाळू पाटील, रफिक शेख, रत्नाकर चौधरी व जळगाव जिल्हा कमिटीने केले आहे.
पाळधीला वादळासह पावसाने झोडपले, काहींच्या संसारावर फिरले पाणी; तर शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले
पाळधी ता, धरणगाव- तालुक्यातील येथे गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने रविवारी शहरात जोरदार हजेरी लावत हाहाकार उडवून दिला....