नवी दिल्ली, आरोग्य तज्ज्ञ लोकांना आहारात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचा समावेश करण्याचे सतत आवाहन करत असतात. सर्वच आजारांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती आवश्यक असते.
रोगप्रतिकारक शक्तीमुळे शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते आणि रुग्ण लवकर बरा होतो. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वांचंच स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. तसंच आहारात फास्ट फूडचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं अनेकांची शारीरिक ऊर्जेची पातळी त्यांच्याही नकळत कमी झालेली असते.
अशात तुम्हालाही शरीरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणं दिसत असतील तर आजपासूनच काही विशिष्ट खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा, असं ‘आज तक’नं दिलेल्या बातमीत म्हटलंय. भारतात कोरोना ओमिक्रॉन विषाणूची लागण झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, आरोग्य तज्ज्ञ लोकांना आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला सतत देत आहेत. रोगप्रतिकारक शक्तीमुळं शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते आणि रुग्ण लवकर बरा होतो.
तुम्हालाही शरीरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणं दिसत असतील तर काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा. हे Belly Dance मुळे शिक्षिकेच्या आयुष्यात वादळ, ‘त्या’ 10 मिनिटांनी बदलली गणितं वनस्पतीजन्य अन्न – वनस्पतींवर आधारित अन्नामध्ये भरपूर पोषक तत्त्वं असतात, जी आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याचे काम करतात. शिवाय, हे अन्न पचण्यासही हलकं असतं. थोडं-फार कमी किंवा जास्त खाल्लं गेल्यास फारसे विपरीत परिणाम होत नाहीत.
ZOE कोविड स्टडीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की जे लोक वनस्पती-आधारित अन्न खातात त्यांना गंभीर आजारी पडण्याची आणि रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 40 टक्के कमी असते. हे ब्रेन स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला समजदार व्यक्ती वाचवू शकतो; ही लक्षणं दिसली की ताबडतोब गाठा हॉस्पिटल इतकंच नाही तर, अशा लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग होण्याचा धोकाही 10 टक्क्यांनी कमी असतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे A, B6 आणि B12 असतात. तर, फळांपासून व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी मिळतात. तसंच, वेगवेगळ्या बिया प्रथिनं, निरोगी स्निग्धांश, व्हिटॅमिन-ई आणि लोहाचा चांगला स्रोत मानल्या जातात.