• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

पाळधीकरांचा ‘प्रताप” चालला अन् २२ गावांनी सुटकेचा निःश्वास टाकला

जि प सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वतः पायी फिरून अधिकाऱ्यांना सूचवले पर्यायी मार्ग

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
January 21, 2022
in Uncategorized
0
पाळधीकरांचा ‘प्रताप” चालला अन् २२ गावांनी सुटकेचा निःश्वास टाकला

पाळधी ता धरणगाव- पश्चिम रेल्वेलाईनवरील गेट नं 153 (चांदसर गेट) हे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या ठिकाणी बोगदा बनवला जाणार आहे. पाळधीसह, झुरखेडा, निमखेडा, धार, शेरी, पथराड बु, पथराड खु, रेल, लाडली, सोनवद, चांदसर, चोरगाव, कवठळ, टहाकळी, वंजारी, खपाट यांच्यासह जोडल्या गेलेल्या सुमारे 22 गावांना या गेट नंबर 153 (चांदसर गेट)मुळे पाळधीला त्वरित पोहोचता येते.

 

हा गेट बंद केल्यामुळे या 22 गावांना दूरचा फेरा पडणार आहे. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे पाळधी गावातून वाहनांची वर्दळ जास्त होऊन गावातील लहान रस्त्यामुळे ट्रॅफिक, अपघाताचा धोका संभवत होता. या कारणांमुळे पाळधीवासीयांचा रेल्वे प्रशासनाच्या नियोजित मार्गाला विरोध होता.

 

कोरोनातून बरे झाल्यावर मंत्रीमहोदय ऑन फिल्ड

 

 

आज सकाळी पश्चिम रेल्वेचे सहायक अभियंता डी के शुक्ला रेल्वे यांनी पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांची त्यांच्या घरी भेट घेतली. या बैठकीत मंत्रीमहोदय व जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी पर्यायी रस्ता सुचवला.

 

 

जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी स्वतः पायी फिरून रेल्वे अधिकाऱ्यांना सुचवलेला पर्यायी मार्ग दाखवला. या पर्यायी मार्गाने रेल्वे अधिकारी आश्वस्त झाले, तुम्ही सुचवलेल्या पद्धतीनेच मार्ग काढला जाईल तोपर्यंत गेट नंबर 153 बंद केला जाणार नाही असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्यासहीत उपस्थितांना दिले. यावेळी उपसरपंच चंदन कळमकर, ग्राप सदस्य चंदू माळी, समाजसेवक चंदू पवार, सोनू माळी, समाधान माळी, मच्छिद्र साळुंखे, बंडू पाटील, पथराड माजी सरपंच अभिमान पाटील व पाळधीसह आजूबाजूच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक होते

Tags: #पालकमंत्री गुलाबराव पाटील#प्रतापराव पाटील#मंत्रीमंडळ#शिवसेनामंत्रालय
Previous Post

कोरोनाचा प्रादुर्भाव बगता ग. स. सोसायटीची निवडणूक प्रक्रीया लांबणीवर

Next Post

पाळधी येथे भोई समाज युवा मंच महाराष्ट्र दिनदर्शिकेचे अणावरण

Next Post
पाळधी येथे भोई समाज युवा मंच महाराष्ट्र दिनदर्शिकेचे अणावरण

पाळधी येथे भोई समाज युवा मंच महाराष्ट्र दिनदर्शिकेचे अणावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधीला वादळासह पावसाने झोडपले, काहींच्या संसारावर फिरले पाणी; तर शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले
जळगाव

पाळधीला वादळासह पावसाने झोडपले, काहींच्या संसारावर फिरले पाणी; तर शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले

  पाळधी ता, धरणगाव- तालुक्यातील  येथे गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने रविवारी शहरात जोरदार हजेरी लावत हाहाकार उडवून दिला....

by Today महाराष्ट्र
June 19, 2022
ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन…
सामाजिक

ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन…

  जळगाव | सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा.बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोगाच्या मार्फत गठित केलेल्या...

by Today महाराष्ट्र
June 15, 2022
आता ‘मिशन झेड.पी.’ ! निवडणुकांमध्ये भगवा डोैलाने फडकणार : ना. गुलाबराव पाटील यांचा संकल्प
Uncategorized

आता ‘मिशन झेड.पी.’ ! निवडणुकांमध्ये भगवा डोैलाने फडकणार : ना. गुलाबराव पाटील यांचा संकल्प

    पाळधी: आपण वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रखर विचार प्रमाण मानून १९८४ पासून जनसेवेत कार्यरत झालो असून या...

by Today महाराष्ट्र
June 6, 2022
जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन..!
जळगाव

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन..!

  जळगाव,  (प्रतिनिधी) - शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योगाची चालना मिळावी या मुख्य उद्देशाने गत ७ वर्षांपासून जैन...

by Today महाराष्ट्र
May 30, 2022
  • Home
  • Sample Page

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group