पाळधी ता धरणगाव- भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाळधी बुद्रुक येथे मार्च 2022 पासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एस.एस.सी परीक्षा केंद्रासाठी मान्यता प्राप्त झाली. मार्च 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी मार्च 2022 च्या दहावी परीक्षा केंद्रासाठी भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाळधी या केंद्राची निवड करण्यात आली असून नुकतेच त्यासंबंधीचे पत्र शासनाकडून प्राप्त झाले.या प्रसंगी संस्थेचे सदस्य माननीय श्री प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडून शाळेचे मुख्याध्यापक श्री डी.डी.कंखरे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.GPS परिवारातर्फे मोठ्या उत्साहात हा आनंद साजरा करण्यात आला.
मनापासून केलेले काम थोडं लेट पण थेट होते या शब्दात प्रतापराव पाटील यांनी सांगितले. डी.डी. कंखरे सर यांच्या कार्याचा गौरव केला.पाळधी व परिसरातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व शैक्षणिक सोईसाठी सदर बाब ही अतिशय महत्वपुर्ण असुन लवकरच शैक्षणिक क्षेत्रात पाळधी पँटर्न नावारूपास येईल असा आशावाद सर्वांनी व्यक्त केला.
या शाळेतील विद्यार्थ्यांची होणार या केंद्रात परिक्षा
माध्यमिक विद्यालय रिंगणगाव
माध्यमिक विद्यालय बांभोरी
एम.टी.पी. उर्दू विद्यालय पाळधी व
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय पाळधी या चार शाळांचा समावेश आहे