पाळधी, ता. धरणगाव येथील इम्पिरियल इंटरनँशनल स्कूल येथे ‘राष्ट्रीय उत्पादक्ता दिन ’ साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे चेअरमन इंजि. नरेश पी. चौधरी यांचे स्वागत शाळेचे प्राचार्य परवीन मॅम यांनी केले. या वेळी इंजि. नरेश पी. चौधरी सरांनी इंजिनियर क्षेत्रातील विविध उत्पादना विषयी विदयार्थ्यांना उदाहरणासह स्विस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य परवीन मॅम यांनी देखील आपल्या भाषनातून शैक्षणिक क्षेत्रातील उत्पादक्ते विषयी मार्गदर्शन केले.
तसेच या वेळी शाळेतील १ ली ते ७ वी पर्यंतचा विदयार्थ्यांनी उत्पादन क्षेत्रातील दुकानदार. दूधवाला, नर्स, डॉक्टर, शेतकरी, टेलर, कुली, पायलट, वकील, शास्त्रज्ञ, इंडीयन आर्मी, शिक्षक, यां सारखे वेशभूषा परिधान करुन उत्पाकत्तेचे महत्व तसेच आपल्या दैनंदिन जीवनात यांची होणारी मदत विदयार्थ्यांनी सुरेख पध्दतीने सादर केली.
तसेच या वेळी शाळेचे मुख्यध्यापक परवीन मॅम व समन्वयक गजानन पाटील सर. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षित अंतर ठेवून सदर कार्यक्रमास उपस्थित होते.