जळगाव| राज्यात काही दिवसापासून भाजपा नेते किरीट सोमय्या व शिवसेना नेते संजय राऊत आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
जळगाव येथील एका कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांनी गुलाबराव पाटलांना सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोप किरीट सोमय्या बद्दल प्रश्न विचारले असता.
त्यांनी सांगितले की किरीट सोमय्या यांना ना कुठे लग्नकार्य आहे ना कोणाच मरण धरण आहे राहील ना मतदार संघाचा विकास करण आहे त्यांना कुठले काम नसल्याने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात लगावला.