जळगाव – यावल तालुक्यात मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ५ हजाराची लाच स्वीकारली म्हणून लाचलुचपत विभागाने यशस्वी सापळा रचत कोतवालासह एका इसमास आज मंगळावर रोजी जाळ्यात ओढले आहे.
सावखेडासिम ता.यावल येथील शेतजमीनचे ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकार नोंद मधील तक्रारदार यांची बहिण कमलबाई यांचे नाव मंडळ अधिकारी किनगाव यांचेकडून कमी करवुन देणार असल्याचे सांगुन आरोपी जहाँगीर बहादुर तडवी, वय-५६ व्यवसाय-कोतवाल, तलाठी कार्यालय मालोद, ता.यावल जि.जळगाव.
रा.मालोद ता.यावल,जि.जळगाव तसेच मनोहर दयाराम महाजन, वय-४५, व्यवसाय-जनरल स्टोअर्स रा.किनगाव ता.यावल जि.जळगाव (खाजगी इसम) यांनी मंडळ अधिकारी किनगाव यांचे नावाने तक्रारदार यांचेकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली व कोतवाल तडवी यांचे सांगणेवरून सदर लाचेची रक्कम मनोहर महाजन, यांनी मंडळ अधिकारी किनगाव कार्यालयासमोर विद्या जनरल स्टोअर्स येथे आज स्वीकारली म्हणून लाचलुचपत विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
सापळा यशस्वी करणेकामी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.प्रदीप पोळ यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.
लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव. दूरध्वनी क्र. ०२५७ – २२३५४७७ मो.क्रं. ८७६६४१२५२९ , टोल फ्रि क्रं. १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.