भूषण महाजन
पाळधी. ता, धरणगाव- येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील स्कूल मधे आज रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपल्या नृत्य समवेत समाज जनजागृती पर नाट्य सादर केले.
नाट्यतून दिला हा संदेश..
सदर नाट्यतून विद्यार्थ्यांनी दारू,हुंडा,तसेच निर्घृण हत्या यावर जनजागृती केली.
यावेळी दारूमुळे आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण हे देऊ शकत नाही तसेच मुलींचं शिक्षण परिवाराला आपण सक्षम करू शकत नाही त्याने परिवाराची आर्थिक पिस्थितीही बदलू शकत नाही त्यामुळे आपल्या परिवाराचा विचार करत आपण आजच दारूच व्यसन सोडणे गरजेचे आहे.
तर सध्या हुंडा मागणीच भूत लोकांच्या डोक्यात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. आणि आपली आर्थिक परिस्थीती सक्षम नसल्याने आपण हुंडा देऊ शकत नाही त्यामुळे आपल्या मुलीला तिच्या सासर च्या लोकांन कडून खूप त्रास सहन करावा लागतो त्या मुळे आपण ही हुंडा घेऊ आणि देऊ ही नये.
तसेच सध्याच्या स्थितीला निग्रून्हतेचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढ ले आहे यावेळी त्यांनी सर्व देवीचे रुप दाखवत ज्या प्रमाणे आपण आपल्या आई व बहिणीला मारू शकत नाही तर मग आपल्या होणाऱ्या मुलीला व बायको का मारताय असे समाज जनजागृती पर संदेश विद्यार्थीनी दिला. सदर नाटकात दिपाली,पुनम,कोमल,उमेश,गौरव, हेंमत,यशवंत, तर ह्या नाटकचे दिकदर्शन दिनेश सोनवणे तर संकल्पना प्रा.शुभांगी सोनवणे यांनी केले सदर नाट्याने जनसामान्यांचे डोळे पाणावले तर नाट्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
त्या सोबत मोबाईल चे दुष्परिणाम यावर देखील त्यांनी प्रबोधन केले.
शहरी भागातील विद्यार्थ्यांना लाजवेल असं नृत्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केले.
या विद्यार्थ्यांना मिळाला स्टुडन्ट ऑफ द इयर चा मान-
नीरज ठाकरे -su kg
तन्मय पाटील -eng मिडीयम
रवेश रामेश्वर खरटे- माध्यमिक
किरण नाथ – कॉलेज
ही शाळा मी व्यवसाय करण्यासाठी नव्हेतर माझ्या या पाळधी परिसरातील पैसे नाही म्हणून कोणीही अशिक्षित राहू नये त्यासाठीचा माझा संकल्प आहे. तसेच या गावाने ज्याप्रकारे एक कॅबिनेट मंत्री दिला तसं यागावातून कलेक्टर आणि IPS अधिकारी देण्यासाठी या GPS च निर्माण असे वक्तव्य कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.
अन् आजीबाईने रडविले…
कार्यक्रमादरम्यान एका आजीबाई ने दोन शब्द बोलण्याची इच्छा व्यक्त केली असता मुखद्यापक यांनी त्यांना परवानगी दिली या वेळी आजीबाई यांनी सांगितले की मला मुलगा नाही मुलगी होती तिचा देखील अपगतात मृत्यू झाला त्यानंतर तिचा सांभाळ मीच करतेय तर तिच्या शिक्षणासाठी माझी परिस्तिथी सक्षम नसल्याचे समजताच गुलाब भाऊ आणि प्रताप भाऊ यांनी तिला शिक्षणासाठी दत्तक घेतले त्या बद्दल मी त्यांची खूप आभारी आहे अस रडतच आजीबाई म्हणाली.
यावेळी पालमंत्री गुलाबराव पाटील,नंदुकुमार बेंडाळे,माध्यमिक शिक्षण अधिकारी,प्राथमिक शिक्षण अधिकारी, मनोज आत्माराम पाटील, मनोज पंडित पाटील,माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे,उद्योगपती गोपाल कासट, गोपाल दर्जी, बी डी ओ जाधव साहेब, सपोनि गणेश बुवा, सपोनि एच गायकवाड, पत्रकार मुन्ना झंवर, संजू भैय्या देशमुख, भूषण महाजन, सरपंच शरद कोळी, सचिन पवार, अनिल कासट, संजू महाराज
तर आभार शाळेचे चेअरमन तथा जि प सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले
सदर स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी कंखरे सर सचिन पाटील सर तसेच योगेश करंदीकर सर यांचा टीम ने परिश्रम घेतले.
बघा व्हिडिओ______