ऑनलाइन टुडे महाराष्ट्र- प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेला झुंड ला सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. ‘फॅन्ड्री ‘ आणि ‘ सैराट ‘ सारख्या सिनेमांच्या यशामुळे नागराज यांचा हा सिनेमा बहुप्रतीक्षित राहिलाय. प्रमोशन साठी म्हणून पण निर्माता भूषण कुमार आणि नागराज यांनी आगळे वेगळे प्रयोग केले. त्यामुळे प्रेक्षकांचा लक्ष आपल्याकडे खेचण्यात हा सिनेमा नक्की यशस्वी झालाय. पण फिल्म परीक्षण तरन आदर्श यांनी केलेल्या ट्विट नुसार झुंड पहिल्या दिवशी 1 .50 करोड रुपये कमावण्यात यशस्वी झालाय. याचे कारण बॉक्सऑफिसवर अजूनही ‘ पावनखिंड ‘ आणि ‘ गंगुबाई काठियावाड’ हे दोन सिनेमे प्रतिस्पर्धी म्हणून आहेत. या सिनेमांनाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलाय. पण तरन आदर्श यांनीच केलेल्या ट्विट नुसार प्रचंड झालेल्या माऊथ पब्लिसिटीमुळे आणि नागराज यांच्या असणाऱ्या तगड्या फॅन फॉलोविंग मुळे सिनेमा येत्या शनिवारी आणि रविवारी नक्की चांगली कमाई करणार. आपल्या देशात मोठे सिनेमे शुक्रवारी प्रदर्शित होण्याचा एक रिवाज आहे. त्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायाच्या दृष्टीने शुक्रवार , शनिवार आणि रविवार हे महत्वाचे दिवस मानले जातात.
पाळधीला वादळासह पावसाने झोडपले, काहींच्या संसारावर फिरले पाणी; तर शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले
पाळधी ता, धरणगाव- तालुक्यातील येथे गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने रविवारी शहरात जोरदार हजेरी लावत हाहाकार उडवून दिला....