पाळधी ता, धरणगाव – धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे माजी आमदार मुरलीधर अण्णा पवार यांच्या पुतळा अनावरण समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज चांदसर नगरित आले होते.
यावेळी चांदसर सह जिल्ह्याभरात शरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.
तसेच अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर देखील लावण्यात आले होते यावेळी या सर्व बॅनर मध्ये एक वेगळाच बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आलं होते.
त्या बॅनरमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांचा भेटीतील स्मितहास्य असलेले छायाचित्र या बॅनर वर लावण्यात आले होते.
राजकारणात कुणी कुणाचा कायम मित्र किंवा शत्रू असत नाही, असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीत म्हणता येईल.
परन्तु ठाकरे आणि पवार यांच्या राजकीय विरोधाचे आणि वैयक्तिक जीवनातील मैत्रीचे किस्सेच वेगळे आहेत.
स्व.बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन धुरंदर.
दोघांची विचारसरणी वेगळी, काम करायची, राजकारणाची पद्धत वेगळी. दोघेही पक्षप्रमुख. पक्षांची कार्यपद्धती वेगळी. वेगवेगळ्या पक्षात असल्या कारणाने राजकीय विरोधक म्हणून दोघेही एकमेकांवर आपापल्या भाषणातून जाहीर टीका करत.
परंतु वैयक्तिक आयुष्यात ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते.
हे बॅनर शिवसेनेचे माजी सभापती तथा चांदसर नगरीचे लोकनियुक्त सरपंच सचिन पवार यांनी लावले होते.
या बॅनरने कार्यक्रमासाठी आलेले सर्वांचे लक्ष वेधून ठेवले होते