पाळधी ता धरणगाव : धरणगाव तालुक्यातील पथराड गावातील झुरखेडा रस्त्यावर सुरू असलेल्या जुगारावर धाड घालून पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. रविवारी (दि.२४) करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी २५२० रुपये जप्त केले आहे.
तर आता अक्षय तृतीया या सणाच्या निमित्ताने या परिसरात गावागावात नव्हे तर गल्लीगल्लीत जुगाराचा अड्डा लागत असतो. या काळात या कारवाईने फारसा मोठा फरक पडेल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथराड गावातील झुरखेडा रस्त्यावर पाहणी केली असता रात्री ०१.१५ वाजेचे सुमारास पथराड बु ता. धरणगांव गावात झुरखेडा रोडवर इलेक्ट्रीकलाईटाचे उजेडातर) नितीन मराठे वय २८ वर्ष रा. पाळधी खुग २) छोटू नथ्यु लंके वय ५३ रा.पथराड बु. ३) पुंडलिक शेनफडु पाटील वय ५३ रापथराड बुर ४) वसंत बळीराम पाटील वय ४५ रा. पथराड बुग ५) नंदु अरुण न्हावकर वय ३३ पथराड युग ६) नवल लहू साळुंखे वय ३३ वर्ष रा.पथराडबा ता. धरणगाव यांचेवर पाळधी दुरक्षेत्र सहा पोलीस निरीक्षक श्री गणेश बुबा. पो. हे कॉ/१६९७ विजय चौधरी यांनी छापा टाकला असता ५२ पत्यांवर पैसे लावुन झन्ना मन्ना नावाचा मांग पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना, व २५२०/- रुपये रोख व पत्ता जुगारीची साधनासह मिळून आले असून पो.कॉ जितेश नाईक यांनी फिर्याद दिलेने त्यांचेवर जुगार कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. बा सदर गुन्हायाचा तपास मा. सहा पोलीस निरीक्षक श्री गणेश बुबा यांचे मार्गदर्शना खाली पोहको विजय चौधरी हे करीत आहेत.