जळगाव- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. अर्थात ग.स. सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.या निवडणुकीत प्रगती शिक्षक सेना, सहकार, लोकसहकार, लोकमान्य, व स्वराज्य असे एकूण पाच पॅनल आहेत.
यामध्ये प्रगती शिक्षक सेना या गटाच्या माध्यमातून सर्व समावेशक उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये माळी समाजाला मनोज अर्जुनराव माळी यांच्या रूपाने उमेदवारी देण्यात आली आहे.
मनोज अर्जुनराव माळी हे मूळ चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील आहेत.मात्र अनेक वर्षापासून नोकरीच्या निमित्ताने ते जळगाव शहरात स्थायिक झाले आहेत.
त्यांचे शिक्षण एम. ए. बी. एड (इंग्लिश) असे झाले असून ते कठोरा या शाळेवर कार्यरत आहेत.तर महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक महासंघाचे ते विद्यमान जळगाव तालुकाध्यक्ष आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. अर्थत ग.स. सोसायटीची(G S Society Jalgaon) वाटचाल नाबाद 122 वर सुरू आहे. आजमितीस संस्थेचे ३४ हजार ९०० सभासद असून संस्थेकडे तब्बल १००० कोटींच्यावर खेळते भांडवल आहे. यावरून संस्थेची सहकार क्षेत्रातील ग.स.च्या वैभवाची प्रचिती येते…
हे आहेत प्रगती शिक्षक सेना गटाचे अधिकृत उमेदवार
बाहेरील मतदारसंघातील उमेदवार
बडगुजर पंकज विजय
गिरासे दिपक चतुर
पाटील निलेश भास्कर
पाटील रत्नाकर राघव
पाटील सचिन चंद्रकांत
पाटील समाधान शिवराम
पाटील सुगमचंद फकिरचंद (नाना पाटील)
पाटील विपीन वसंतराव
साळुंखे राजेंद्र पुंडलिक
सपकाळे नरेंद्र कडू (नरुभाऊ)
सोनवणे राजेंद्र आत्माराम
स्थानिक मतदारसंघातील उमेदवार
माळी मनोज अर्जुनराव
नेमाडे गिरीश शिवाजी
पाटील निंबा यादव
सनेर योगेश जगन्नाथ
सूर्यवंशी मनोहर जोहरलाल
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील उमेदवार
पवार विजय शांतीलाल
महिला राखीव मतदार संघातील उमेदवार
पाटील प्रेम लता संजय
साठे ज्योती शिवाजी
इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातील उमेदवार
पाटील रावसाहेब मांगो
विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातील उमेदवार
पवार अमरसिंग तिरसिंग
पॅनलचे निवडणूक चिन्ह ढाल तलवार असून या पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन सर्व समाज समावेशक सुज्ञ सभासद व नागरिकांकडून करण्यात येत आहे.