पाळधी ता. धरणगाव- येथे आरोग्य सेवेचा वसा जोपासणारे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचा वाढदिवसानिमित्त गायत्री शक्तीपीठ पाळधी यांचा वतीने भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुरुवातीला गायत्री शक्तीपीठ येथील पुजारी सुभाष सुरडकर यांनी प्रतापराव पाटील यांच्याकडून त्यांच्या आरोग्य व भावी वाटचालीस यश प्राप्ती मिळावी याकरिता यज्ञ पूजन करून घेतले.
यावेळी पुजारी सुरडकर यांनी सांगितले की भारतीय संस्कृतीत वाढदिवस हा दिवे लावून साजरा केला पाहिजे आपण कितवा वाढदिवस साजरा करीत आहोत त्यानुसार दिवे तयार करून हे दिवे आपण लावावीत दिवे लावलेले आपला आयुष्य हे वाढत असतं असं देखील पुजारी सुरडकर यांनी सांगितले.
यावेळी प्रतापराव पाटील आपले आभार पर भाषण करताना भारावले
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले तथा प्रथमता माझ्या वाढदिवसा निमित्ताने वेगळ्या पद्धतीचे नियोजन करून मला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे या शुभेच्छांनी मला आगामी आयुष्यात जनसेवा करण्याची ताकद व माझ्या मतदार संघाची विकास करण्याची शक्ती मिळाली असल्याचं प्रतापराव पाटील म्हणाले.
सदरचे शिबिर हे दोन दिवसीय असून पहिल्या दिवशी या शिबिरात 110 रुग्णांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या आहेत.
मार्गदर्शन व औषधे दिली. शिबिराचे उद्घाटन प्रतापराव पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी गायत्री शक्तिपीठ तर्फे दिवे लावून मंत्रोच्चारात पाटील यांच्यातर्फे पूजन करण्यात आले. शिबिरात माजी सभापती मुकुंदराव नन्नवरेे उद्योजक दिलीप पाटील, ए.पी.आय. गणेश बुवा ग्रामपंचायत सदस्य प्रसाद शिंदे माजी सरपंच अरुण पाटील ,अलीम देशमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील युवा सेनेचे अमोल पाटील, गोपाळ सोनवणे ,भूषण महाजन आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी गायत्री परिवारातर्फे संजू महाराज, सुभाष सुरडकर, गजानन सुरडकर, भिकन ठाकूर, गुलाब माळी, राजू सोनार, विमलबाई ठाकूर, संगीता ठाकूर, शांताबाई पाटील, पुष्पा सोनार आदींनी परिश्रम घेतले.