प्रवासादरम्यान अनेकांना गाडी लागते, उलट्या आणि मळमळ होऊन व्यक्ती हैराण होते. पण ज्यांना ही समस्या आहे त्यांच्यासाठी ही माहिती फार उपयुक्त आहे. प्रवासा दरम्यान काहींना हमखास उलट्या, मळमळीचा त्रास होतो. त्यामुळे गाडी लागत असल्याच्या त्रासाने लोकं दूरचा प्रवास करायला घाबरतात. मात्र त्या व्यक्तींनी न घाबरता या गोष्टी खा, नक्कीच फायदा होईल.
आलं
आल्यामध्ये असे काही घटक असतात ज्याने मळमळ होण्याची समस्या टाळण्यास मदत होते्. उटली सारखं होत असल्यास त्यावर आराम मिळतो. त्यामुळे कुठे प्रवास करताना सोबत एक आल्याचा तुकडा ठेवा किंवा आल्याचा चहा, आले किंवा कँडी अशा प्रकारे आले खाऊ शकता.त्याचबरोबर गरम पाण्यात एक चमचा ठेचलेले आले टाकून घेऊ शकता. त्याने अस्वस्थता कमी होऊन उलटी थांबण्यास मदत होते. त्यामुळे बाहेर पडताना सोबत हमखास आलं ठेवा.
केळी
डिहायड्रेशन वाटत असल्यास किंवा मळमळ होत असल्यास एक केळ खा. केळी पोटॅशियम रिस्टोर करण्यात मदत करू शकतात. याशिवाय केळी खाल्ल्याने उलटीच्या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळते. त्यामुळे जर लांबचा प्रवास करणार असाल तर केळी सोबत ठेवा. उलट्या आणि मळमळ वाटत असल्यास केळी खा आराम मिळेव.
लिंबू
प्रवासादरम्यान वारंवार उलट्यांचा त्रास होत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास लिंबू सोबत ठेवावे. लिंबू उलट्या आणि मळमळ या समस्यांपासून आराम देतं. प्रवासा करताना कायम गरम पाणी सोबत ठेवा. उलट्या किंवा मळमळ सुरू होताच पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ मिसळून प्या. काही वेळात आराम मिळेल.
पुदिना
प्रवासादरम्यान, जर उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांसाठी पुदीनाही गुणकारी मानला जातो. पुदिना हा पोटात थंडावा ठेवतो आणि स्नायूंनाही आराम देतो. त्ामुळे प्रवासात शक्य असल्यास पुदिन्याच्या गोळ्या खाऊ शकता किंवा पुदिन्याचे सरबत बनवूनही पिऊ शकता. त्यानेही आराम मिळतो.