पाळधी: भोई समाजाचे आराध्य दैवत संत भीमा भोई यांची १७२ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते श्री संत भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भलेही मुझे नर्क मिले फिर भी मैं इस जगत का कल्याण करुंगा- संत भीमा भोई यांचा या वाक्यातून समाजिक क्षेत्रात काम करण्याची ऊर्जा मिळत असते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक आरोप-प्रत्यारोप होत असतात यावेळी संत भीमा भोई यांनी समाजाकरिता केलेले काम त्यांचा त्याग डोळ्यासमोर ठेवत सामाजिक कार्यात काम करण्याची दिशा मिळत असते असे प्रतिपादन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे प्रतापराव पाटील यांनी केले.
अभिवादनाचा कार्यक्रम घेऊन साध्या पध्दतीने जयंती उत्सव साजरा झाला. पाळधी येथील सर्व भोई समाज तसेच सर्व समाजातील समाजबांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. युवा अध्यक्ष मुकेश भोई यांनी संत भीमा भोई यांचे कार्य आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांविषयी माहिती देत मार्गदर्शन केले.
यावेळी गांवातील प्रमुख उपस्थित माजी सभापती मुकूंदराव नन्नवरे,सरपंच शरद कोळी,चंदु माळी, पत्रकार भुषण महाजन,गोपाल सोनवणे चंद्रमणी नन्नवरे, सी.के.भोई सर,सुरेश नन्नवरे,सुधाकर माळी,सुभाष कापुरे,इंजि.मयुर मोरे आदि उपस्थित मान्यवर यशस्वेतेसाठी श्री.संत भिमा भोई बहुउद्देशिय संस्था पदाधिकारी समस्त भोई समाज बांधव,भिमराव भोई,डिगांबर भोई,प्रविण भोई ,मुकेश भोई,प्रशांत भोई,कमलेश भोई,दिपक भोई,राजेंद्र भोई,सागर भोई,समाधान भोई,महेश भोई,प्रविण भोई,किरण भोई आदि यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.