• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन…

ओबीसींचा एम्पेरिकल डाटा आडनाव नुसार न घेता जातीनिहाय संकलित करावा समता परिषदेची मागणी

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
June 15, 2022
in सामाजिक
0
ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन…

 

जळगाव | सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा.बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोगाच्या मार्फत गठित केलेल्या समितीमार्फत ओबीसींची माहिती सॉफ्टवेअर द्वारे आडनाव नुसार संकलित न करता जातीनिहाय संकलित करण्यात यावी या मागणीचे निवेदन समता परिषद युवक आघाडीच्या वतीने देण्यात आले.

 

ओबीसी समाजासाठी आरक्षण टिकाव याकरिता शासनातर्फे एम्पेरिकल डाटा बनवण्याचे काम सुरू केले आहे.

परंतु हा डाटा जातीनिहाय न घेता आडनावावरून घेतला जात आहे. याला ओबीसी समाजाने विरोध केलाय एक आडनाव अनेक जाती प्रवर्गात येते प्रत्येक जाती वर्गातील व्यक्तींची नावे घेताना परिवारातील किमान एक व्यक्तीचे जन्मदाखला एलसी चेक करून माहिती घ्यावी.

 

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केले नुसार शासनाने ओबीसी ची माहिती संकलित करण्यासाठी मा. बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे सदर आयोगाने माननीय सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेले एम्पिरिकल टाटा दररोज जाऊन ओबीसींचे खरी आर्थिक सामाजिक राजकीय स्थिती माहिती संकलन अपेक्षित होते परंतु असे कुठेही निदर्शनास येत नाही.

 

आयोग वरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअर द्वारे आडनाव नुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे अशाप्रकारे समस्त ओबीसी समाजाची फसवणूक होत आहे सॉफ्टवेअर व्दारे सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती माहिती जमा करणे म्हणजेच ओबीसी समाजाचे भविष्यातील कायमस्वरूपी कधीही भरून न निघणारे नुकसान होणार आहे.

 

याकरिता समर्पित आयोगा द्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तत्काळ थांबविण्यात यावे व तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील असेदेखील निवेदनात म्हटले आहे.

 

सदर निवेदन हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

 

समता परिषदेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील, बारा बलुतेदार संघाचे मुकूंद मेटकर, लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन धांडे, छावा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, जिल्हा सरचिटणीस नितीन महाजन, महानगराध्यक्ष हेमरत्न काळुंके, महिला महानगराध्यक्ष भारती काळे, रामू सैनी, प्रकाश बाविस्कर, शैलेश परदेशी, मनोज महाजन, दिलीप पाटील, नाना पाटील, गोपाल सोनवणे, काशिनाथ भोई, गणेश महाजन, अतुल हराळ, गणेश कोळी, यासह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

Previous Post

आता ‘मिशन झेड.पी.’ ! निवडणुकांमध्ये भगवा डोैलाने फडकणार : ना. गुलाबराव पाटील यांचा संकल्प

Next Post

पाळधीला वादळासह पावसाने झोडपले, काहींच्या संसारावर फिरले पाणी; तर शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले

Next Post
पाळधीला वादळासह पावसाने झोडपले, काहींच्या संसारावर फिरले पाणी; तर शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले

पाळधीला वादळासह पावसाने झोडपले, काहींच्या संसारावर फिरले पाणी; तर शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल, अवसानायातील सोसायट्यांमुळे राजकारण तापले
महाराष्ट्र

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल, अवसानायातील सोसायट्यांमुळे राजकारण तापले

खामगाव येथील बहुचर्चित खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध संचालक पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत आठ जणांनी अर्ज सादर केले. तथापि, शनिवार...

by Today महाराष्ट्र
March 31, 2023
डिजिटल क्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी नोकऱ्या उपलब्ध! जाणून घ्या यात तुमचं करिअर कसं बनेल?
करियर

डिजिटल क्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी नोकऱ्या उपलब्ध! जाणून घ्या यात तुमचं करिअर कसं बनेल?

आजच्या काळात मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी डिजिटल मार्केटिंगवर करोडो रुपयांच्या जाहिराती सुरू केल्या आहेत. या कारणास्तव, जाहिरात बजेट सतत...

by Today महाराष्ट्र
March 31, 2023
मोदी सरकारनं मुंलींना दिलं मोठं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज वाढले, जाणून घ्या नवीन दर
महाराष्ट्र

मोदी सरकारनं मुंलींना दिलं मोठं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज वाढले, जाणून घ्या नवीन दर

तुम्ही जर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने मुलींसाठी मोठं गिफ्ट जाहीर केलं...

by Today महाराष्ट्र
March 31, 2023
पोलीस शिपाई पदांसाठी 2 एप्रिलला लेखी परिक्षा
महाराष्ट्र

पोलीस शिपाई पदांसाठी 2 एप्रिलला लेखी परिक्षा

जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या ११८८ उमेदवारांची लेखी परीक्षा २ एप्रिलला सकाळी ८.३०...

by Today महाराष्ट्र
March 31, 2023
  • Home
  • Sample Page

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group