पाळधी; ता, धरणगाव- पाळधी येथील नव्याने उदयास आलेल्या भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अर्थात जीपीएस स्कूलच्या प्रणांगणात नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला मिळते.
या शाळेत सर्व संत महापुरुषांचे जयंती पुण्यतिथी साजरी केली जात असते.त्याचप्रमाणे विविध विशेष दिन देखील याच शाळेत साजरी केले जात असतात. प्रत्येक कार्यक्रम परंपरागत पद्धतीने साजरा न करता काहीतरी नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्याचा प्राचार्य सचिन पाटील यांचे नेहमीच प्रयत्न असतात.
जॉय ऑफ शेअरिंग, फन विथ बाप्पा, विविध रंगांचे दिवस, आजी आजोबांचा दिवस, वेगवेगळ्या कार्यशाळा इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमार्फत राबवले जातात.
आज मात्र या शाळेतील चिमुकल्यांनी वेगळेच काही आकर्षण ठरणारी गोष्ट जीपीएस च्या प्रणांगणात केली. यामध्ये चिमुकल्यांनी त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून जीपीएस चा लोगो तयार केला.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपण शिकत असलेल्या शाळेबद्दल असलेलं जिव्हाळ्याचं नातं दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणारी जीपीएस शाळा आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी व कर्तुत्वाने नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे.