जळगाव| शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेनेत विविध पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर आ.गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे पाळधी येथील आबा माळी यांचा हा मेसेज ठरतोय शिवसैनिकांसाठी डोकेदुखी. या मेसेज मध्ये त्यांनी असे म्हटले आहे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवत त्यांचा समर्थनात सकाळी ११ वाजता जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार.
असा मेसेज त्यांनी व्हाट्सअप सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या मेसेजमुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे एकीकडे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्यभरासह जिल्ह्यात देखील शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू असताना शिवसेनेला लागलेली गळती ही कुठेही थांबलेली दिसत नाही.
उद्याच्या होणाऱ्या या राजकीय भूकंपाकडे राजकीय पक्षांसह शिवसैनिक व सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे.