पाळधी ता, धरणगाव : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. पाळधी येथे दारूचे दुकान फोडले. दुकान फोडल्यानंतर चोरांनी पैसे उचलून नेले. एवढंच नाहीतर महागडी दारू सह सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर सुद्धा चोरांनी गायब केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील एस.पी वाईन्स या दारूच्या दुकानात चोरी झाली.
रात्री दुकान बंद झाल्यानंतर चोरांनी मोठ्या शिताफीने ही चोरी केली. पहिला रात्री वाईन शॉप शेजारी असलेले बॅटरी चे दुकान देखील चोरट्यांनी फोडले होते व त्या ठिकाणी देखील चोरी झाली होती.
सदर चोरीच्या सत्र सुरू असल्याने पाळधीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या चोऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी प्रशासनाने या चोरांचा योग्य ते बंदोबस्त करावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.
सविस्तर
– दि. २६/०८/२०२२ रोजी रात्री १०.१५ वाजेचे दरम्यान ते दि. २७/०८/२०२२ रोजी सकाळी ०९.३० वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरिल एस.पी. वाईन शॉप पाळधी बु।। शिवार येथे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एस.पी. वाईन शॉपच्या गोडावून चा वरील व्हेल्टीनेटर जवळील पत्रा उचकावून आत प्रवेश करुन खालील वर्णनाचा व किंमतीचा माल चोरुन नेला आहे. त्याचे वर्णन खालील प्रमाणे.
1) 16,080 रु. की. च्या ब्लेंडर प्राईड कंपनी च्या 180 एम.एल. मापाचा 48 नग असलेला 1 बॉक्स 2) 8,400 रु. की च्या ब्लेंडर प्राईड कंपनी च्या 90 एम.एल. मापाचा 48 नग असलेला अर्धा बॉक्स 3) 13,500 रु. की. च्या ओसी ब्लु कंपनीच्या । लिटर मापाचे 9 नग असलेला 2 बॉक्स
4) 72,000 रु. की. च्या ओसी ब्लू कंपनीच्या 180 एम.एल. मापाचे 48 नग असलेला 10 बॉक्स
5) 80,000 रु. की. च्या ओसी ब्लु कंपनीच्या 90 एम.एल. मापाचे 100 नग असलेला 10 बॉक्स 6) 16,200 रु. की. च्या ब्लेंडर प्राईड कंपनीच्या 750 एम.एल. मापाचे 12 नग असलेला 1 बॉक्स
7) 17.520 रु. की. च्या अँटीक्युटी कंपनीच्या 180 एम.एल. मापाचे 48 नग असलेला 1 बॉक्स 8) 18,240 रु. की. च्या ब्लेडर रिझर्व कंपनीच्या 180 एम.एल. मापाचे 48 नग असलेला 1 बॉक्स
9) 67,200 रु. की. च्या डीएसपी ब्ल्याक कंपनीच्या 180 एम.एल. मापाचे 48 नग असलेला 10 बॉक्स 10) 13,330 रु. की. च्या ब्लॅक डॉग कंपनीच्या 60 एम.एल. मापाचे 62 नग
11) 9.300 रु. की. च्या मॅकडॉल कंपनीच्या 2 लिटर मापाच्या 6 नग 12) 4,18,000 रु. रोख त्यात 2000,500, 200, 100, 50 रु. दराच्या नोटा
7,49,770 /- एकुण
सदर घटनास्थळी सहा.पोलीस अधिक्षक श्री. कृषीकेशकुमार रावले सो. पोलीस निरीक्षक श्री. राहुल खताळ, सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश बी. बुवा यांनी भेट दिली असुन झालेल्या चोरी बाबत त्या परिसरातील संपुर्ण सि.सी. टिव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे. फिर्यादी भुषण अभीमान जगताप रा. रामेश्वर कॉलनी जळगांव ह.मु.पाळधी बु॥ ता.धरणगांव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.