पाळधी ता, धरणगाव- येथील रामराज्य (एस) ग्रुपच्या व महर्षी वाल्मिक बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी श्री गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवशी पाळधी ते श्री क्षेत्र पद्मालय अतिशय आनंद उत्सवात पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते.
गणेश भक्त श्रद्धेने मोठ्या संख्येने या उत्साहात सहभागी होत असतात.
यावर्षी देखील श्री गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच दिनांक 4 वार रविवार रोजी पाळधी येथून प्रस्थान होणार आहे. सदर दिंडीचे प्रस्थान प्रसंगी पूजन हे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते करण्यात येणार आहे.
यावर्षी देखील दिंडी सोहळ्यात सामील होण्यासाठी श्री गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर दिंडीचा आयोजन ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे पिंटू कोळी व रामराज्य (एस) ग्रुपच्या माध्यमातून केले जात असते.
असा आहे दिंडीचा एकदिवसीय प्रवास_____
दिंडीचे प्रस्थान सकाळी साई मंदिर येथून सकाळी सात वाजता होणार असून त्यातून पारधी बुद्रुक येथील कोळीवाडा येथे श्री गणेश गणपती बाप्पाचे पूजन करून दिंडीचे प्रस्थान पद्मालय कडे होणार आहे.
सदर दिंडीमध्ये रिंगणगाव व पद्मालय मंदिराचे स्वागत गेट जवळ चहापाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिंडीची सांगता ही पद्मालय येथील गणपती बाप्पांचे पूजन करून करण्यात येणार असून तेथे आलेल्या सर्व गणेश भक्तांची भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
तरी आयोजकांच्या वतीने गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने पाया दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.