पाळधी, ता, धरणगाव – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पहिल्यांदाच मुख्यमंत्री पाळधी गावात येणार असल्याने पाळधीकरांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाळधीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ना.गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे हे जळगाव जिल्ह्यात येत असून
पाळधी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह नवीन इमारतीचे अनावरण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच ना. गुलाबराव पाटील यांच्या पाणीपुरवठा विभागामार्फत २२ कोटी रुपयांची सौर ऊर्जावर चालणारा प्रकल्प महाराष्ट्रात पहिला पाळधी येथे राबविण्यात येणार आहे.याचे देखील ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पाळधी येथे भव्य असे सभेचे नियोजन देखील करण्यात आले आहे.
असा आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा दौरा_
मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी ०१.३० वाजता वर्षा शासकीय निवासस्थान मलबार हिल मुंबई येथून प्रस्थान.
दुपारी २.०० वा. मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने जळगावकडे प्रयाण
दुपारी.३.००.वा. जळगाव विमानतळावर आगमन व तिथून मोटारीने पाळधी तालुका धरणगाव कडे प्रयान
दुपारी ४.०० वा. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नवीन इमारतीचे अनावरण केल्यानंतर पाळधी येथील गांधी चौक येथे जाहीर सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
सायं ४.३० वा. पाळधी येथून मोटारीने मुक्ताईनगर कडे प्रयाण.
मुक्ताईनगर येथील सभा झाल्यावर मुख्यमंत्री सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.