• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने मुले चोरीचा संशय.. यावरुन नागरिकांनी महिलेसोबत केलं ते भयंकरच….

चाळीसगाव शहरातील धक्कादायक घटना

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
September 24, 2022
in क्राईम, जळगाव, राज्य
0
तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने मुले चोरीचा संशय.. यावरुन नागरिकांनी महिलेसोबत केलं ते भयंकरच….

चाळीसगाव- मुलं चोरणारी महिला समजून एका निराधार महिलेला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी चाळीसगाव शहरातील सदानंद चौकात घटना घडली आहे.

चाळीसगाव शहरातील सदानंद चौकात तोंडाला रुमाल बांधलेली एक महिला फिरत होती. त्या महिलेने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने नागरिकांनी त्या महिलेवर मुलं चोरत असल्याचा संशय घेतला. तसेच याच संशयावरुन नागरिकांनी तिला मारहाण केली. त्या महिलेचं नागरिकांनी काही एक ऐकून न घेता जोड्या आणि चपलांनी मारहाण केली.अतसेच महिलेला पोलीस ठाण्यात नेत पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता, महिलेची चौकशी केली असता, ती महिला खंडवा येथील असून तिचे कुणीही नातेवाईक आहे, मिळेल त्या ठिकाणी मिळेल ते काम करुन करुन महिला तिचा उदरनिर्वाह भागवते, अशी माहिती समोर आली आहे. त्या महिलेचा चेहरा पूर्णतः जळलेला होता यामुळे तिने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र नागरिकांनी घटनेची खातरजमा न करता कायदा हातात घेत महिलेला मारहाण केली. पोलिसांनी त्या महिलेची चौकशी करून त्या महिलेला जळगाव येथील आशादीप या शासकीय वसतीगृहात दाखल केले आहे. अशी माहिती पोलीस निरिक्षिक के.के.पाटील यांनी दिली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे मॅसेज सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. चाळीसगाव शहर पोलिसांकडून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे अशी संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता थेट पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांन कडून करण्यात आले आहे.

Tags: crimejalgaonjalgaonews
Previous Post

पासबुकात नोंद करुन आणतो म्हणून एटीएम कार्ड अन् पासबुक घेतले.. अन् भावंडांनी बहिणीलाच गंडविले

Next Post

अखेर प्रतापराव पाटील यांचे प्रयत्न यशस्वी, दुर्गा माता दौड करिता मिळाली परवानगी, नवरात्र उत्सव आनंदात साजरा करा पण..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!
जळगाव

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!

" ऐसी कळवळ्याची जाती करी लाभेविण प्रीती" संतांच्या या उक्तीप्रमाणे जगणारे अनेक लोक आहेत. कृषी विभागातून निवृत्तीनंतर खरंतर पांडुरंग अण्णांना...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन
जळगाव

भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन

सुरक्षेच्या दृष्टीने भादली-भुसावळदरम्यान भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, वीजखांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना
जळगाव

शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना

नशिराबाद गावात शाळेची निर्माणाधीन संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय बालकाचा दबून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी घडली.याबाबत...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती
जळगाव

14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती

शासनाने जळगाव शहरातील रस्ते कामांसाठी ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्या निधीतून...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
  • Home
  • Sample Page

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group