पाळधी ता. धरणगाव पाळधी पोलीस दूरक्षेत्र येथे आगामी नवरात्रोत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी परिसरातील व पाळधी येथील सर्व दुर्गा देवी मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाळधी येथे मागील वर्षापासून सुरू झालेल्या श्री दुर्गामाता दौड गेल्या वर्षी अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडली होती.
तसेच यावर्षी देखील दौड करिता पोलीस प्रशासनाकडून परवानगी मागण्यात आली होती मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाने परवानगी करिता वरिष्ठ पोलीस स्टेशन कडे देखील अर्ज करण्यास सांगितले होते यावेळी जिल्हा परिषदेचे प्रतापराव पाटील यांनी स्वतः या विषयात सहभाग घेत वरिष्ठ पोलीस स्टेशन कडून परवानगी मिळवून दिली.
अशी माहिती बैठकी प्रसंगी प्रतापराव पाटील यांनी दिली या निमित्ताने प्रतापराव पाटील यांचे सर्व देवी भक्तांच्या वतीने आभार मानले जात आहे.
सदर बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की श्री गणेश उत्सव सारखेच श्री दुर्गा उत्सव देखील शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करायचे आहेत दिलेल्या नियमांचे पालन करून व कोणाच्या सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याचे भान ठेवून सर्वांनी दुर्गा उत्सव साजरा करायचा आहे यासह अन्य सूचना देखील बुवा यांनी उपस्थिततांना दिल्या.
पाळधी येथील दुर्गा उत्सव राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री सदा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरू केला आहे. असे सेवानिवृत्त शिक्षक फुलपगार सर यांनी सांगितले व जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी पत्रकार गोपाल सोनवणे यांनी देखील नवरात्र उत्सव साजरा करत असताना धार्मिक व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून नवरात्र उत्सव साजरा करावा असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भिला रोकडे, माजी सरपंच अरुण पाटील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर माळी सुधाकर माळी पप्पू माळी गोपाल सोनवणे फुलपगार सर यासह मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन पत्रकार भूषण महाजन यांनी केले