पाळधी ता, धरणगाव – आज रोजी धरणगाव येथील नगरसेवक व त्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थनात उद्धव सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेत प्रवेश केला.
यामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघासह धरणगावात उद्धव सेनेला जोरदार धक्का बसला आहे, नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश केल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मोठी ताकद वाढली आहे.
आम्हाला आउटगोइंग करण्याचा विचारात असणाऱ्यांचा गटातून जोरदार इनकमिंग – ज्या पक्षासाठी आम्ही 35 वर्ष अहोरात्र कष्ट केली आणि पक्ष वाढवला त्याच पक्षातून आमची आउटगोइंग करण्याच्या विचार करणाऱ्यांच्याच गटातून आमच्याकडे जोरदार इन्कमिंग सुरू आहे- असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचारांना धरूनच आम्ही चाळीस आमदारांनी जो उठाव केला होता त्या उठावाला समर्थन देत या नगरसेवकांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव सेनेला मोठी गळती लागली आहे. एकापाठोपाठ एक धक्के सेनेला शिंदे सेनेच्या माध्यमातून दिले जात आहेत.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात व धरणगाव मध्ये या नगरसेवक व कार्यकर्त्यांचा प्रवेश शिंदे सेनेत झाल्याने उद्धव सेनेला मोठा फटका बसला असून शिंदेसेनेला मात्र याचा मोठा फायदा आगामी ध.न.पा निवडणुकीत होणार आहे.
नगरसेवक वासू चौधरी, कमलेश बोरसे, वसीम पिंजारी, पटेल, भैया चौधरी,राकेश देशमुख, समाधान पाटील,रियाजुद्दीन शेख, सय्यद रईस, मोहीम शेख,संजू झुंजारराव,सागर पाटील, रोहित पाटील,आकाश झुंजारराव,सोमो पाटील, अमोल महाले, पप्पू पाटील, भूषण लोहार,कमलेश बोरसे, आशिष गुजराती,शशिकांत काका,वसीम भाई, गौरव झुंजारराव, प्रसाद पाटील,ओम झुंजारराव,विनोद झुंजारराव,मनोज झुंजारराव, भैय्या चौधरी, राकेश पाटील, नंदकिशोर पाटील यासह अन्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा समर्थनात शिंदे सेनेत प्रवेश केला.
यावेळी जि प सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव ननवरे, किशोर पाटील, आबा माळी अनिल माळी धर्मेंद्र पंडित, उदय झंवर, गोकुळ नाना पाटील यास अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.