• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

दिवाळीचा सण फटाके फोडले जाणारच, तर अशी घ्या लहान मुलांची काळजी

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
October 21, 2022
in आरोग्य
0
दिवाळीचा सण फटाके फोडले जाणारच, तर अशी घ्या लहान मुलांची काळजी

 

ऑनलाइन टुडे महाराष्ट्र- दिवाळीचा सण सुरु झाला आहे. दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा सण आहे. या निमित्ताने विविध प्रथांबरोबरच दिवे लावले जात असतात.

 

फटाके फोडले जातात. फटाके फोडताना लहानांपासून ते मोठ्यांरपर्यंत सगळेच फटाके फोडण्याचा मनापासून आनंद घेत असतात. मात्र, हा अनंद घेत असतानाच आरोग्याची देखील काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

 

दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांनी होणाऱ्या बहुतेक दुखापतींचा डोळ्यांवर थेट परिणाम होतात. फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापती होतात. दृष्टीला होणाऱ्या दुखापती दरवर्षी मोठ्या संख्येने नोंदवल्या जातात आणि त्या प्रामुख्याने फटाक्यांमुळे होतात. हात आणि बोटांबरोबरच डोळ्यांवर देखील फटाक्यांचा परिणाम होतो.

 

याच संदर्भात, प्राध्यापक डॉ. एस. नटराजन, प्रमुख, व्हायट्रो रेटिनल सेवा, डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्स वर्ल्डवाइड आणि आदित्यज्योत आय हॉस्पिटल, मुंबईतील डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे युनिट यांनी दिवाळीच्या संदर्भात डोळ्यांची कशी काळजी घ्यायची यावर माहिती दिलेली आहे.

फटाक्यांचा धोका हा फक्त फटाके फोडणाऱ्या व्यक्तींनाच नसतो तर आसपास उभ्या असलेल्या तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनाही तितकाच असतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

 

दुखापतीचे प्रकार

नेत्र दुखापतींची तीव्रता सौम्य चुरचुर आणि नेत्रपटलावर ओरखडा उमटण्यापासून रेटिनाला होणारे गुंतागुंतीचे आजार आणि अंधत्वाची शक्यता असलेल्या ओपन ग्लोब दुखापतीपर्यंत अशू शकते. फटाक्यांमध्ये मिसळलेल्या गन पावडरमधील रसायनांमुळेही डोळ्यांना दुखापती होतात. सातत्याने धूर येत राहिल्यामुळे डोळे चुरचुरतात आणि त्यातून पाणी येते. फटाक्यांतून येणाऱ्या धुरामुळे लॅरिंजायटिस आणि अन्य काही प्रकारचे प्रादुर्भाव घशामध्ये होतात. फटाके धोकादायक असतात, कारण, ते सोन्याचे ज्वलन करण्याइतपत उच्च तापमानावर (1,800° F) जातात. हे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमानाहून सुमारे 1,000 अंशांनी अधिक असते, या तापमानात काच वितळते आणि त्वचा तिसऱ्या स्तरापर्यंत (थर्ड डिग्री) भाजून निघू शकते. अशा प्रकारच्या दुखापती टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

 

बहुतेक फटाक्यांमध्ये गन पावडर असते, त्यामुळेच फटाक्यांचा स्फोट होतो. फटाक्यांचे स्फोट बेभरवशाचे असल्यामुळे अगदी काळजी घेऊन किंवा देखरेखीखाली फटाके उडवणाऱ्यांनाही दुखापती होऊ शकतात. दिवाळीच्या काळात प्रदूषणाचा स्तर कळस गाठतो, हवेतील नायट्रोज ऑक्साइड आणि सल्फर डायॉक्साइडची पातळी लक्षणीयरित्या वाढते.

 

डोळ्यांना होणाऱ्या प्रमुख दुखापती :

▪ ओपन ग्लोब दुखापत : ही आय वॉल अर्थात नेत्र भित्तिकेला होणारी ‘फुल थिकनेस’ दुखापत असते.

▪ क्लोज्ड ग्लोब दुखापत : ही नेत्र भित्तिकेच्या संपूर्ण जाडीला छेद न जाता/ती न फुटता झालेली दुखापत असते.

▪ जळजळ : डोळ्याभवती खरचटणे

▪ लॅमेलर लॅक्रिएशन : नेत्र भित्तिकेच्या जाडीवर अंशत: परिणाम करणारी जखम

▪ लॅक्रिएशन : टोकदार घटकामुळे नेत्र भित्तिकेच्या संपूर्ण जाडीला होणारी दुखापत

▪ पेनिट्रेटिंग (खोलवर) दुखापत : ही ‘एण्ट्रन्स वुंड’सह झालेली ओपन ग्लोब दुखापत असते.

▪ छिद्रित दुखापत : ही एण्ट्रस्ट आणि एग्झिट प्रकारच्या दुखापतींसह झालेली ओपन ग्लोब दुखापत असते.

‘हे’ टाळा :

डोळे चोळू नका किंवा त्यावर ओरखडे येऊ देऊ नका.

डोळे आणि चेहरा व्यवस्थित धुवा.

डोळ्यांची चुरचुर होत असेल किंवा काही बाह्यघटक डोळ्यात गेला असेल, तर पापण्या पूर्ण उघडून धरा आणि डोळ्यांवर वारंवार पाण्याचे शिपके द्या.

बाह्यघटक मोठा असेल किंवा डोळ्यात चिकटला असेल, तर तो काढण्याचा प्रयत्न करू नका.

डोळे मिटलेले ठेवा आणि नेत्रविकारतज्ज्ञांकडे जा.

डोळ्यात कोणतेही रसायन गेले असेल, तर तत्काळ डोळे व पापण्यांभवतीचा भाग पाण्याने ओला करा आणि 30 मिनिटे पाणी लावत राहा. तत्काळ नेत्रविकारतज्ज्ञांना दाखवा.

लहान मुलांनी ‘अशी’ घ्या काळजी :

 

दुखापत झालेला डोळा चोळू नका. त्यामुळे रक्तस्राव वाढू शकतो किंवा दुखापत आणखी तीव्र होऊ शकते.

दुखापतग्रस्त डोळ्यावर कोणताही दाब देऊ नका. अशा परिस्थितीत फोम कप किंवा ज्यूसच्या कार्टनचा तळ डोळ्यावर धरणे किंवा बांधणे या दोनच गोष्टी केल्या जाऊ शकतात.

वेदनाशामकांसह कोणतीही ओटीसी औषधे देऊ नका.

कोणतेही ऑइंटमेंट लावू नका. त्यामुळे डॉक्टरांना डोळा तपासणे आणि दुखापतीबाबत निदान करणे कठीण होऊन बसते.

मुलांना मार्गदर्शन किंवा देखरेखीखालीही फटाक्यांशी खेळण्याची परवानगी देऊ नका.

सावधगिरी बाळगा –

फटाके नेहमी मोकळ्या जागेत वाजवा, गॉगल्स घाला, स्वच्छ पाण्याने हात धुवा.

लहान मुले फटाके वाजवत असताना मोठ्यांनी लक्ष द्यावे. कोणतीही दुखापत सहजपणे घेऊ नका; डॉक्टरांना दाखवा आणि प्रोफेशनल मदत घ्या.

अपघाताने आग लागल्यास पाण्याने भरलेली बादली आणि वाळू लगेच सापडेल अशा ठिकाणी सज्ज ठेवा.

फटाके सुरक्षित जागी बंद खोक्यात आणि लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत असे ठेवा.

फटाके चेहरा, केस आणि कपड्यांपासून दूर ठेवा.

फटाके वाजवताना कृत्रिम धाग्यांपासून (सिंथेटिक) तयार केलेले कपडे घालू नका.

फटाके वाजवताना ते किमान हातभर लांब राहतील याची काळजी घ्या आणि फटाके वाजताना बघायला उभे राहताना किमान पाच मीटर्सचे अंतर ठेवा.

फटाके वाजवण्यासाठी जाताना काँटॅक्ट लेन्सेस काढून ठेवा. त्याऐवजी चष्मा वापरा. चष्म्याने तुमच्या डोळ्यांचे संरक्षणही अधिक चांगल्या प्रकारे होईल.

फटाक्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते पाण्याने भरलेल्या बादलीत घालून निष्क्रिय करा.

जळलेले फटाके अपघाताने पायाखाली येऊन जखम होऊ नये म्हणून नेहमीच उत्तम पादत्राणे वापरा.

Previous Post

ल.पा.प्रकल्पाच्या मुख्यवितरीका व पाटचाऱ्यांची दुरुस्ती चे प्रस्ताव सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

कौतुकास्पद;रिक्षा मध्ये विसरुन गेलेल्या मुलीला रिक्षा चालकाने पाळधी पोलिसांच्या मदतीने सोडले घरी…

Next Post
कौतुकास्पद;रिक्षा मध्ये विसरुन गेलेल्या मुलीला रिक्षा चालकाने पाळधी पोलिसांच्या मदतीने सोडले घरी…

कौतुकास्पद;रिक्षा मध्ये विसरुन गेलेल्या मुलीला रिक्षा चालकाने पाळधी पोलिसांच्या मदतीने सोडले घरी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना
Uncategorized

शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना

नशिराबाद गावात शाळेची निर्माणाधीन संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय बालकाचा दबून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी घडली.याबाबत...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती
Uncategorized

14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती

शासनाने जळगाव शहरातील रस्ते कामांसाठी ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्या निधीतून...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल, अवसानायातील सोसायट्यांमुळे राजकारण तापले
महाराष्ट्र

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल, अवसानायातील सोसायट्यांमुळे राजकारण तापले

खामगाव येथील बहुचर्चित खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध संचालक पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत आठ जणांनी अर्ज सादर केले. तथापि, शनिवार...

by Today महाराष्ट्र
March 31, 2023
डिजिटल क्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी नोकऱ्या उपलब्ध! जाणून घ्या यात तुमचं करिअर कसं बनेल?
करियर

डिजिटल क्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी नोकऱ्या उपलब्ध! जाणून घ्या यात तुमचं करिअर कसं बनेल?

आजच्या काळात मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी डिजिटल मार्केटिंगवर करोडो रुपयांच्या जाहिराती सुरू केल्या आहेत. या कारणास्तव, जाहिरात बजेट सतत...

by Today महाराष्ट्र
March 31, 2023
  • Home
  • Sample Page

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group