• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

बाबा राम रहीमला पॅरोल रद्द करून पुन्हा तुरुंगात पाठवा

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
October 27, 2022
in देश
0
बाबा राम रहीमला पॅरोल रद्द करून पुन्हा तुरुंगात पाठवा

 

मुंबई – बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला वर्षात तिसऱ्यांदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले आहे. आता ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आल्याने राम रहिम मोकळा श्वास घेत असून अनेक कार्यक्रमात सहभाग होत आहे.

विशेष म्हणजे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राम रहीमने त्याचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज केला. दिवाळीच्या रात्री रिलीज झालेला हा व्हिडिओ यूट्यूबवर हिटलिस्टमध्ये आला आहे. गेल्या 24 तासांत म्युझिक व्हिडिओला 42 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावरुन, आता चांगलाच वादंग उठला आहे. तर, राम रहिमचा पॅरोल रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

 

पॅरोलवर सुटलेला गुरमीत इथेच थांबला नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो नियमितपणे ऑनलाइन सत्संग करत आहे. भाजपचे अनेक नेतेही या शिबिरात सहभागी होत आहेत. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी यावरुन खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या की, हरियाणा सरकार ज्या प्रकारे पॅरोल सुविधा देत आहे, ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. मोइत्रा यांनी ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणे कोडिफाइड पॅरोलची वकिली केली, असे मोईत्रा यांनी म्हटले. तर, दिल्लीमहिला आयोगाच्या अध्यक्षांनीही हरयाणा सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, राम रहिम हा बलात्कारी आणि खूनी असल्याचंही त्यांनी म्हटलंय

 

राम रहिमला न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे, मात्र, हरयाणा सरकार पाहिजे तेव्हा त्याला पॅरोल देत आहे. तो सत्संग आयोजित करतो, आणि हरयाणा सरकारचे उपसभापती आणि महापौर या सत्संगाला हजेरी लावतात. त्यामुळे, सरकारने राम रहिमचा पॅरोल रद्द करावा आणि तात्काळ त्याला तुरुंगात पाठवावे, अशी मागणीही स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

२० वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा

राम रहीम २०१७ मध्ये लैंगिक शोषण प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. यासोबतच पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि रणजित यांच्या हत्येप्रकरणीही त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. यावर्षी पंजाब निवडणुकीपूर्वी ७ फेब्रुवारी रोजी राम रहीम २१ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर २७ जून रोजी राम रहीमला ३० दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला. दरम्यान, आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी तो सध्या 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

 

Previous Post

हे आहेत बडीशेप आणि मधाचे सेवन करण्याचे फायदे..!

Next Post

छठच्या निमित्ताने यूपी आणि बिहारच्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेच्या १२४ छठ विशेष गाड्या

Next Post
खुशखबर, रेल्वेत १६ हजार जागांची बंपर भरती; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी..!

छठच्या निमित्ताने यूपी आणि बिहारच्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेच्या १२४ छठ विशेष गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतापराव पाटलांना लागले कीर्तनाचे ‘वेड” कसे ते जाणून घ्या
सामाजिक

प्रतापराव पाटलांना लागले कीर्तनाचे ‘वेड” कसे ते जाणून घ्या

  पाळधी, ता, धरणगाव- धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथे राज्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात...

by Today महाराष्ट्र
January 11, 2023
Uncategorized

काय सांगता ! चक्क थंड पाण्यात शिजवला जातो ‘हा’ जादुई तांदूळ

काय सांगता ! चक्क थंड पाण्यात शिजवला जातो ‘हा’ जादुई तांदूळ जाणून घ्या... संपूर्ण माहि ती नवी दिल्ली : Boka Tandul…...

by Today महाराष्ट्र
January 11, 2023
आनंदाची बातमी, भारतातील मुलींची पहिली शाळा  भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा
सामाजिक

आनंदाची बातमी, भारतातील मुलींची पहिली शाळा  भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा

  मुंबई- थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं सुरु केलेल्या भारतातील मुलींची पहिली शाळा अर्थात भिडे...

by Today महाराष्ट्र
December 21, 2022
आमदार चषक; आज पासून पाळधी येथे  कबड्डीचे सामने रंगणार, जिल्हाभरातील खेळाडूंची उपस्थिती लाभणार..
क्रीडा

आमदार चषक; आज पासून पाळधी येथे  कबड्डीचे सामने रंगणार, जिल्हाभरातील खेळाडूंची उपस्थिती लाभणार..

पाळधी; ता, धरणगाव - येथे ना. गुलाबराव पाटील यांचा माध्यमातून आमदार चषक २०२२  70वी (पुरुष/महिला) गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी...

by Today महाराष्ट्र
December 8, 2022
  • Home
  • Sample Page

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group