पाळधी ता,धरणगाव येथे दिनांक २८ नोव्हेंबर रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिनानिमित्त चला महात्मा फुले ऐकुया या उक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई येथील सावित्रीच्या लेकी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध युवा व्याख्याता मोनिका काळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार जनसामान्यांचा घराघरात पोहोचविण्याचा उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन फुले ब्रिगेड युवा मंच पाळधी यांचा वतीने करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी व समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन फुले ब्रिगेड युवा मंचचे अध्यक्ष अनिल माळी यांचा सह सहयोजकांनी केले आहे.