पाळधी; ता, धरणगाव – येथे ना. गुलाबराव पाटील यांचा माध्यमातून आमदार चषक २०२२ 70वी (पुरुष/महिला) गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले असून यावेळी जोरदार कबड्डीचे सामने रंगणार आहेत.
पाळधी परिसरात प्रथमताच अशा भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याने तरुण मंडळी मध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सदर स्पर्धेचे आयोजन पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील शाळेच्या प्रणांगणात करण्यात आले असून यावेळी चषकामध्ये ३० पुरुष संघ तर ६ महिला संघ सहभागी होणार आहेत होणार आहेत.
सदर चषक दिनांक ९, १० व ११ डिसेंबर रोजी दिवस-रात्र खेळली जाणार आहेत.
चषक मध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता ना गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून पाळधी येथे नव्याने सुरू झालेल्या पद्मसिद्धी लॉन येथे राहण्याची व जेवणाची देखील सुव्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेकरिता जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारणी अध्यक्ष: मोहनराव भावसार
कार्याध्यक्ष : श्यामभाऊ कोगटा
सहकार्यवाहक :- नितीन बरडे
उपाध्यक्ष : बशीर बागवान, चंद्रकांत लोंढाया, सुनील राणे, चैत्राम पवार
पंच मंडळ अध्यक्ष अलेक्झांडर मणी, तसेच अरुण गावंडे, हरीश शेळके, हरीश शेळके
तसेच गुलाबरावजी पाटील स्कूल
यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धासाठी पंचप्रमुख म्हणून सुनील राणे, स्पर्धा निरीक्षक बन्सी माळी व निवड समिती सदस्य म्हणून गिरीष नाईक, महेश कोडे यासह अन्य उपस्थित मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.
याठिकाणी दोन हजार पेक्षा अधिक संख्येने प्रेक्षक सहभागी होऊ शकतात एवढी बैठक वयवस्था करण्यात आली आहे.
चषकाच्या यशस्वीतेसाठी हे घेत आहेत परिश्रम-
संस्थेचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गर्शनाखाली जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, युवा उद्योजक विक्रम पाटील, मुख्याध्यापक डी. डी. कंखरे, प्रा.सचिन पाटील प्रा. योगेश करंदीकर , क्रीडा शिक्षक डी. एस. पाटील, क्रीडा शिक्षक राकेश धनगर यासह शाळेचे अन्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.