पाळधी, ता, धरणगाव- धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथे राज्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कीर्तनाचा कार्यक्रमाची माहिती जिल्हा परिषदचे सदस्य प्रतापराव पाटील यांना मिळाली होती.
यावेळी प्रतापराव पाटील यांना किर्तन ऐकण्याचा ‘वेड” लागलं असल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्ते व मित्रपरिवारसह कीर्तन ऐकण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
पंचक्रोशीत अथवा जवळचा अंतरावर कुठेही रविकिरण महाराजांचे किंवा कोणत्याही महाराजांचे कीर्तन आहे याची माहिती प्रतापरावांना मिळाली म्हणजे ते व त्यांचा मित्रपरिवार किर्तन ऐकायला गेल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळेच जनसामान्यांमध्ये प्रतापरावांना कीर्तनाचे ‘वेड” लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.
प्रसंगी कीर्तनकार रविकिरण महाराज यांनी मागच्या जन्माचे भोग कसे भोगावे लागतात यावर सुंदर असा दृष्टांत देत समाज प्रबोधन केले.
त्यांच्या अहिराणी भाषेत बोलताना त्यांनी आहिरणी भाषे बद्दल सांगितले की आपली अहिराणी भाषा जिवंत ठेवण्यासाठी अहिराणी भाषेत बोलणे गरजेचे आहे. कारण जगातील सर्वात प्रेमळ भाषा म्हणजे आपली अहिराणीच आहे असे देखील रविकिरण महाराजांनी सांगितले.
त्याचप्रमाणे रविकिरण महाराजांच्या अहिराणी भाषेतील कीर्तनाचं वेड देखील संपूर्ण महाराष्ट्राला लागलं आहे.
यावेळी प्रतापराव पाटील यांचासह
योगेश पाटील, बारकू माळी, मच्छिंद्र कोळी, दाडी मामा, एकनाथ भोई, सचिन भोई, अजय कोळी, गोकुळ ननवरे ,अजय कोळी ,दिनेश कडोसे ,भूषण महाजन ,यासह मित्रपरिवार सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.