सुरक्षेच्या दृष्टीने भादली-भुसावळदरम्यान भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, वीजखांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी केली.
भादली स्थानकापासून सकाळी नऊला निरीक्षण सुरू झाले. भुसावळला दुपारी दीडला निरीक्षण संपले. दुपारी साडेतीनला भुसावळ ते भादलीदरम्यान १२० किलोमीटर पर ॲवर स्पीडची ट्रायल रन घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली.
निरीक्षणादरम्यान भुसावळ विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) विवेककुमार गुप्ता, मुख्य अभियंता (बांधकाम) संजय झा, उपमुख्य अभियंता बांधकाम पंकज धावरे, वरिष्ठ विभागीय अभियंता तरुण दंडोतिया, वरिष्ठ विभागीय परिचालन अधिकारी डॉ. एस. मीना, वरिष्ठ विभागीय सिग्नल अभियंता विजय खैंची आदी उपस्थित होते.