Gold Price Hike: सोन्याचा दर नव्या उच्चांकावर पोहोचणार; आठवड्याभरात 1 लाख रुपयांचा टप्पा गाठणार
सोन्याच्या दरात काही दिवसांपूर्वी घसरण झाली तसेच सोन्याचा दर 56000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यासर्वांमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण आता पुनह्ा एकदा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. या तेजीमुळे सोन्याचा दर नवा उच्चांक गाठत आहे. त्यातच आता आठवड्याभरात सोन्याचा दर नव्या उच्चांकावर पोहोचून थेट 1 लाख रुपये प्रति तोळा इतका होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जाणून घेऊयात इतक्या मोठ्या तेजीमागचं कारण काय.

का वाढतायत सोन्याचे दर?
2025 या वर्षात सोन्याच्या दरात मोठी तेजी आहे. आतापर्यंत सोन्याच्या दराने 20 वेळा नवा उच्चांक गाठला आहे. अमेरिका – चीन यांच्यातील ट्रेड वॉरमुळे गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याच्या दरात वाढ होत आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारात सुद्धा पहायला मिळत आहे. तर भू-राजकीय अनिश्चितता, अमेरिकेतील टॅरिफ, केंद्रीय बँकांकडून होत असलेली सोने खरेदी आणि व्याजतर कपातीची अपेक्षा हे सर्व घटक सोन्याच्या तेजीला सहकार्य करत आहेत.
जगात सोन्याची तेजी
जागतिक पातळीवर सुद्धा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. स्पॉट सोन्याच्या किमती प्रथमच 3200 डॉलर्स प्रति औंसच्या पुढे गेल्या आहेत. अमेरिकन सोन्याचा वायदा 3237.50 डॉलर्स प्रति ओंस इतका झाला आहे.
1 तोळ्याचा भाव 1 लाख रुपये होणार?
सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे आठवड्याभरात सोन्याचा एक तोळ्याचा भाव 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शाह यांनी द हिंदू बिझनेसलाईनला सांगितले की, अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेड रिझर्व्ह 2025 मध्ये दोनदा व्याजदर कमी करू शकते. यामुळे सोन्याच्या किंमत प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. व्याजदरात कपात झाल्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतील असा अंदाज त्यांनी वर्तवला. यामुळे सोन्याची मागणी वाढेल आणि परिणामी दरात वाढ होईल.
तर मोतीलाल ओसवालचे किशोर नारणे यांनी म्हटलं, सोन्याच्या वाढत्या दराला कोणतीही मर्यादा नाहीये. सीएनबीसीसोबत बोलताना त्यांनी म्हटलं, सोन्याचा दर अगदी सहजपणे 4000-5000
डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही जो आकडा निश्चित कराल तो कधी ना कधी निश्चितच येईल.
इतर तज्ज्ञांचं मत काय?
काही तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दराला एक लाख रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी खूप वेळ लागू शकतो. सध्या सोन्याच्या दरात असलेली तेजी हा ट्रेंडचा विस्तार आहे, नवी बूल रॅली नाहीये. सोन्याचे दर पुढील आठवड्यात एक लाख रुपयांपर्यंत पोहोण्याची शक्यता कमी आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer : हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. सोने किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला आम्ही देत नाही. या संदर्भात गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)