अवकाळी पाऊस, वारा, गारपिटीमुळे केळी, आंबा, ज्वारी पिकांच नुकसान
अवकाळी पाऊस, वारा व गारपिटीमुळे केळी आंबा जवारी पिकाच प्रचंड नुकसान. केळीच्या पानाची चाळणी, केळी उत्पादनावर होणार घट.
उन्हाळी ज्वारी भुईसपाट घरावरील पत्रे उडून गेले. नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणी, सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी.
जिल्हात झालेल्या वादळी वारा अवकाळी पाऊस गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट व वादळी वाऱ्याने घरावरचे पत्रे उडून गेले वाऱ्यामुळे जवारी आंबा फळबागाचे व केळीच्या पानाची चाळण झाली आहे. यामुळे केळीचे घड परिपक्व होण्यास अडचण येणार असून केळी उत्पादनात सुद्धा घट होणार आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.