Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Gold Rate Today: महागाईच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या आजचे दर
- बिझनेस - महाराष्ट्र

Gold Rate Today: महागाईच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या आजचे दर

मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम सराफ बाजारावरही होताना दिसतोय! जळगावच्या बाजारात सोन्याच्या दरांबाबत आज काय घडलं? तर चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. जाणून घ्या आजच्या बाजारातील महत्त्वाची अपडेट!

मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसून येत आहेत. यामुळे सोने, चांदीसह पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू आहेत. त्यातच जळगावच्या सराफ बाजारातही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र, आज 14 नोव्हेंबर २०२६ रोजी सोने खरेदीदारांसाठी दिलासादायक चित्र आहे. सोन्याचे दर स्थिर असून चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे.

सोन्याच्या दरात कोणताही बदल नाही

सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना दागिने खरेदी करताना आर्थिक गणित जुळवावे लागत आहे. अशा परिस्थितीत आज जळगावच्या सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 40 हजार 595 रुपये इतका आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आज दर स्थिर असल्याचा दिलासा मिळाला आहे.

चांदीच्या दरात एक हजार रुपयांची घसरण

दुसरीकडे, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठीही आज दिलासादायक बातमी आहे. 14 नोव्हेंबर रोजी एक किलो चांदीच्या दरात एक हजार रुपयांची घट झाली आहे. या घसरणीनंतर जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव 1 लाख 85 हजार 400 रुपये इतका झाला आहे.

सोने-चांदी खरेदीदारांसाठी काय आहे आजची स्थिती?

जळगावच्या सराफ बाजारातील आजच्या दरांनुसार सोन्याच्या किमती स्थिर आहेत, तर चांदी स्वस्त झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बाजारातील बदलांनुसार आगामी काळात सोने-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/