Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Prasad Lad: रोहित पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप; आमदार प्रसाद लाड यांची सूचक पोस्ट! म्हणाले, स्वतःचे राजकारण…
- महाराष्ट्र - मुंबई - राजकारण

Prasad Lad: रोहित पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप; आमदार प्रसाद लाड यांची सूचक पोस्ट! म्हणाले, स्वतःचे राजकारण…

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांना त्यांनी काय सल्ला दिला? जाणून घ्या सविस्तर…

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (16 नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेत या अपघाताच्या तपासावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही आरोप केले. रोहित पवारांच्या या आरोपांना आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलं?

अजित पवार यांच्या विमान अपघाताला साडेनऊ महिने उलटूनही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत, असा दावा रोहित पवार यांनी केला. या अपघाताचा तपास आणि विमान कंपनीच्या भूमिकेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान VSR Ventures या कंपनीचे होते. या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर कारवाई का होत नाही? अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही? तसेच या प्रकरणाचा तपास राज्याच्या CID ऐवजी CBI कडे का सोपवला जात नाही, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

यावेळी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि VSR कंपनीचे मालक यांच्यातील कथित जवळिकीचा मुद्दाही उपस्थित केला. यासाठी त्यांनी काही फोटो आणि माहिती पत्रकार परिषदेत दाखवली. तसेच फडणवीस यांनी या कंपनीच्या मालकाला संरक्षण दिल्याचा आरोप केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपघात घडवून आणण्यात थेट सहभाग असल्याचा आरोप आपण करत नसल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. कंपनीच्या मालकाला वाचवले जात असल्याचा आपला संशय असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रसाद लाड यांनी रोहित पवारांना सुनावले

रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला. प्रसाद लाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, युवा नेत्याकडून सर्वोच्च नेते होऊ इच्छिणाऱ्या रोहित पवारांना माझा स्पष्ट आणि जाहीर सल्ला आहे की, स्वर्गीय अजितदादांच्या दुर्दैवी निधनाचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका.

तसेच तुमच्यासह कोणासोबत कोणाचे किती फोटो आहेत, हे दाखवून देण्याची वेळ आणू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात विषारी बीजे पेरून सामाजिक आणि राजकीय वातावरण दूषित करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. राजकीय महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही. मात्र, ती पूर्ण करताना संयम, विवेक आणि माणुसकी विसरू नये. राजकारणात आक्रमकता असावी, पण त्याला विवेकाची जोड असणे गरजेचे आहे, असेही प्रसाद लाड यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/