Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची सूचना! ई-केवायसीबाबत व्हायरल होणाऱ्या लिंकपासून सावध राहा
- महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची सूचना! ई-केवायसीबाबत व्हायरल होणाऱ्या लिंकपासून सावध राहा

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत कोणतेही नवीन सरकारी निर्देश जारी झालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावरील बनावट लिंकपासून सावध राहावे आणि वैयक्तिक माहिती शेअर करू नये.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. तसेच ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी काही लिंकदेखील मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. मात्र, अशा मेसेज आणि लिंकवर विश्वास ठेवण्यापूर्वी लाभार्थी महिलांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत शासन स्तरावरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतेही नवीन निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या ई-केवायसीच्या लिंक अधिकृत असल्याचे समजू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अनधिकृत लिंकवर क्लिक करून आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा इतर वैयक्तिक माहिती भरल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर आपली गोपनीय माहिती शेअर करू नये. तसेच ई-केवायसीच्या नावाखाली माहिती मागणाऱ्या संशयास्पद मेसेजपासूनही दूर राहावे.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेबाबत शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत माहिती दिली जाणार आहे. यासाठी अधिकृत सोशल मीडिया माध्यमे तसेच वृत्तपत्रांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडता केवळ अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/