Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • आसेगाव-दुधगाव रस्त्यावर गोवंश मांस जप्त!बोरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई; दोघे ताब्यात, १ लाखाचा मुद्देमाल जप्त!
- Breaking News - क्राईम - महाराष्ट्र

आसेगाव-दुधगाव रस्त्यावर गोवंश मांस जप्त!बोरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई; दोघे ताब्यात, १ लाखाचा मुद्देमाल जप्त!

जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जातीचे मांस विक्रीसाठी घेऊन जात असताना बोरी पोलिसांच्या डीबी पथकाने कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ५० किलो गोवंश जातीचे मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर […]

जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जातीचे मांस विक्रीसाठी घेऊन जात असताना बोरी पोलिसांच्या डीबी पथकाने कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ५० किलो गोवंश जातीचे मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी ८.५० वाजण्याच्या सुमारास आसेगाव ते दुधगाव जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी इस्माइल मुनाफ कुरेशी (वय ३८, रा. खाटीक गल्ली, बोरी) व अहमद कुरेशी हे गोवंश जातीचे मांस विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले.पोलिसांनी त्यांच्याकडून अंदाजे ५० किलो गोवंश जातीचे मांस, मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारा सत्तूर, लोखंडी पात्याची कुऱ्हाड, हिरो डिलक्स मोटारसायकल (क्र. MH 24 U 0716) आणि रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

l ” lडीबी पथकाची उल्लेखनीय कारवाईबोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांभ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील राजेश जटाळ, संघसेन कांबळे, अमोल मुंडे, कृष्णा दुधाटे आणि महिला पोलीस कर्मचारी फरहीन रंगरेज यांनी ही कारवाई केली. यावेळी पीएसआय घोरपडे, श्रीराम दंडवते आणि साखरे हे उपस्थित होते.या प्रकरणी पोलीस कर्मचारी संघसेन श्रीधर कांबळे यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(सी), ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चौधरी करीत आहेत.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/