Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Shivsena: सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध करताना बाळासाहेबांचा फोटो फाडला; शिंदेंच्या नेत्या शायना एनसींचा VIDEO व्हायरल, परळीत ठाकरे गट आक्रमक
- महाराष्ट्र - मुंबई - राजकारण

Shivsena: सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध करताना बाळासाहेबांचा फोटो फाडला; शिंदेंच्या नेत्या शायना एनसींचा VIDEO व्हायरल, परळीत ठाकरे गट आक्रमक

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना शायना एनसी यांच्याकडून चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, परळीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुस्तकात अपमान करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मधील महिला नेत्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची प्रत फाडून निषेध व्यक्त केला. मात्र, याच पत्रकार परिषदेदरम्यान शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून एक मोठी चूक घडली.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पाने फाडत असताना शायना एनसी यांनी चुकून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेचे पडसाद बीड जिल्ह्यातील परळी येथेही पाहायला मिळाले. परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्या कृतीचा निषेध केला. यावेळी शायना एनसी यांचा फोटो फाडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे युवक जिल्हाप्रमुख सोमेश्वर गित्ते यांनी तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना राजकीय ओळख आणि मोठी पदे मिळवून दिली. अशा नेत्याचाच फोटो फाडण्याची कृती अत्यंत निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/