Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • मासरूळच्या सरपंच पुत्राचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; गावावर पसरली शोककळा
- Breaking News - नागपूर - महाराष्ट्र - विदर्भ

मासरूळच्या सरपंच पुत्राचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; गावावर पसरली शोककळा

मासरूळच्या सरपंच पुत्राचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; गावावर पसरली शोककळा पाणीपुरवठा योजनेच्या विहिरजवळ निसटलेला पाईप जोडण्यासाठी गेले होते धरणात बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथे धरणाच्या पाण्यात बुडून ४८ वर्षीय मधुकर महाले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मधुकर महाले हे मासरूळच्या विद्यमान सरपंच शकुंतलाबाई महाले यांचे पुत्र होते. गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ पाईप जोडण्याचे काम आटोपून […]

मासरूळच्या सरपंच पुत्राचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; गावावर पसरली शोककळा पाणीपुरवठा योजनेच्या विहिरजवळ निसटलेला पाईप जोडण्यासाठी गेले होते धरणात

बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथे धरणाच्या पाण्यात बुडून ४८ वर्षीय मधुकर महाले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

मधुकर महाले हे मासरूळच्या विद्यमान सरपंच शकुंतलाबाई महाले यांचे पुत्र होते. गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ पाईप जोडण्याचे काम आटोपून परतत असताना ते धरणाच्या पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मासरुळ गावावर शोककळा पसरली आहे. मासरुळ येथील पाणीपुरवठा योजनेची विहीर पद्मावती धरणात असल्याने पाण्यात बुडालेली आहे. मात्र मोटारपंप चा पाईप निघाल्याने सरपंच पुत्र आणि इतर दोन सहकारी हे पाण्यातून विहिरीपर्यंत गेले.

मात्र परत येताना पाण्यातून पोहत असताना मधुकर महाले यांचा पोहताना दम तुटला आणि मधुकर पाण्यात बुडाले. सोबतच्या दोन लोकांनी पाण्यातून बाहेर येण्यात यश मिळवले, मात्र मधुकर महाले यांना वाचवता आले नाही. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापनाने शोध मोहीम राबवून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. मधुकर महाले यांच्या निधनाने महाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मासरूळसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/