Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • निमगावचा पंचशील ध्वज हटवल्याने बौद्ध समाज आक्रमक
- नागपूर - महाराष्ट्र - विदर्भ

निमगावचा पंचशील ध्वज हटवल्याने बौद्ध समाज आक्रमक

निमगावचा पंचशील ध्वज हटवल्याने बौद्ध समाज आक्रमक; तहसीलदारांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने 26 नोव्हेंबरपर्यंत ध्वज पूर्ववत लावण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा गडचिरोली जिल्ह्यातील निमगाव येथे बौद्ध समाजाचा पंचशील ध्वज आणि धम्मखांब हटविल्याच्या निषेधार्थ बौद्ध समाजाने तीव्र आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात शेकडो बौद्ध बांधव आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक […]

निमगावचा पंचशील ध्वज हटवल्याने बौद्ध समाज आक्रमक; तहसीलदारांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने 26 नोव्हेंबरपर्यंत ध्वज पूर्ववत लावण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

गडचिरोली जिल्ह्यातील निमगाव येथे बौद्ध समाजाचा पंचशील ध्वज आणि धम्मखांब हटविल्याच्या निषेधार्थ बौद्ध समाजाने तीव्र आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात शेकडो बौद्ध बांधव आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निमगाव येथे मागील दहा वर्षांपासून बौद्ध समाजाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. मात्र, 18 नोव्हेंबर रोजी धानोरा तहसीलदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिस बंदोबस्तात पंचशील ध्वज आणि धम्मखांब हटविल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.या कारवाईमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. 26 नोव्हेंबर संविधान दिनापूर्वी पंचशील ध्वज पूर्ववत लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/