Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: November 21, 2026

Uncategorized

शेतातील पत्र्याच्या गोठ्यात गर्भलिंग निदानाचा काळा धंदा; बोगस डॉक्टरसह तिघे रंगेहात जेरबंद

अकोला आरोग्य उपसंचालक आणि बुलढाणा पीसीपीएनडीटी पथकाची संयुक्त कारवाई; पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त — Sonography centre बुलढाणा : शेतातील पत्र्याच्या गोठ्याला सोनोग्राफी केंद्र बनवून अवैधरित्या गर्भलिंग निदानाचा काळा धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालय आणि बुलढाणा, अकोला व वाशिम येथील पीसीपीएनडीटी पथकाने संयुक्त कारवाई करत बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात […]

नागपूर राजकारण विदर्भ

३१ डिसेंबर २०२७ पूर्वी विदर्भ राज्य निर्मितीचा संकल्प; ‘अभी नहीं तो कभी नहीं’ – विदर्भ राज्य आंदोलन समिती

किशोर गडकरी, भंडारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘मिशन २०२७’ अंतर्गत ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील ११ जिल्हे व १२० तालुक्यांत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती करण्यात येणार असून, जिल्हावार व विभागवार ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प’ मेळावे आयोजित केले जात आहेत. याच अभियानांतर्गत २५ नोव्हेंबर २०२६ रोजी […]

LIVE महाराष्ट्र विदर्भ

मी मेल्यावरच तेरवीला पैसे मिळतील काय?

वृद्ध आजीचा उपनिबंधक कार्यालयात टाहो लक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर पायदळ मार्च; कष्टाचे पैसे परत मिळण्याची मागणी “मी मेल्यावरच माझ्या तेरवीला माझे पैसे मिळतील काय? माझे कुणीच नाही, किती वेळा कार्यालयाच्या चकरा मारू? हात जोडून विनंती करते, माझ्या घामाचे २४ हजार रुपये तरी द्या हो!” अशा आर्त शब्दांत ७० वर्षीय शांताबाई गोमा मांढरे यांनी शुक्रवारी […]

Uncategorized

थंडीचा कडाका वाढला, १५ ते २० दिवसांत उपजिल्हा रुग्णालयात तब्बल ७ हजार रुग्णांची तपासणी..!

वाशिम प्रतिनिधी धनंजय राठोड… वातावरणात झालेल्या बदलामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. वाढत्या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, मागील १५ ते २० दिवसांमध्ये कारंजा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, ताप यांसह विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील १५ ते […]

Uncategorized

बुलढाण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक अमित नारड़िया यांची आत्महत्या, व्हॉट्सअँप स्टेटसमुळे चर्चाना उधाण

बुलढाणा प्रतिनिधी कुणाल देशपांडे – शहरातील प्रसिद्ध ‘प्रकाश जनरल स्टोअर्स’चे मालक आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक अमित प्रकाश नारडिया (वय ४४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहरासह व्यापारी वर्तुळात आणि त्यांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर रोडवरील आपल्या निवासस्थानी सर्वात वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये अमित नारडिया […]

Breaking News क्राईम महाराष्ट्र विदर्भ

गोवंशांची निर्दयी वाहतूक उघड, सहा वाहनांत ४४ जनावरे

चारा-पाण्याची व्यवस्था नाही, वाहतुकीचा परवानाही नाही; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ४८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्तबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही ते खैरव मार्गावर गोवंशांची निर्दयीपणे वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहा वाहनांमध्ये तब्बल ४४ गोवंशांना क्षमतेपेक्षा अधिक कोंबून, चारा-पाण्याची व्यवस्था न करता तसेच वाहतुकीचा परवाना नसताना त्यांची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी देऊळगाव राजा […]

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/