Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • गोवंशांची निर्दयी वाहतूक उघड, सहा वाहनांत ४४ जनावरे
- Breaking News - क्राईम - महाराष्ट्र - विदर्भ

गोवंशांची निर्दयी वाहतूक उघड, सहा वाहनांत ४४ जनावरे

चारा-पाण्याची व्यवस्था नाही, वाहतुकीचा परवानाही नाही; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ४८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्तबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही ते खैरव मार्गावर गोवंशांची निर्दयीपणे वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहा वाहनांमध्ये तब्बल ४४ गोवंशांना क्षमतेपेक्षा अधिक कोंबून, चारा-पाण्याची व्यवस्था न करता तसेच वाहतुकीचा परवाना नसताना त्यांची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी देऊळगाव राजा […]

चारा-पाण्याची व्यवस्था नाही, वाहतुकीचा परवानाही नाही; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ४८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्तबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही ते खैरव मार्गावर गोवंशांची निर्दयीपणे वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

सहा वाहनांमध्ये तब्बल ४४ गोवंशांना क्षमतेपेक्षा अधिक कोंबून, चारा-पाण्याची व्यवस्था न करता तसेच वाहतुकीचा परवाना नसताना त्यांची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत ८ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४४ गोवंश आणि ४० लाख रुपये किमतीची सहा वाहने असा एकूण ४८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल नोंदविण्यात आला आहे. शेख शब्बीर शेख शौकत, अब्दुल रहेमान शेख नजीर, शेख नूर महमंद शेख करीम, भास्कर मुरलीधर उगलमुगले, निखील रमेश पांडे, आणि शेख शाहरुख शेख फारुख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस कर्मचारी प्रवीण मदन डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ५२३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमासह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर करीत आहेत.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/