Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • बुलढाण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक अमित नारड़िया यांची आत्महत्या, व्हॉट्सअँप स्टेटसमुळे चर्चाना उधाण
- Uncategorized

बुलढाण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक अमित नारड़िया यांची आत्महत्या, व्हॉट्सअँप स्टेटसमुळे चर्चाना उधाण

बुलढाणा प्रतिनिधी कुणाल देशपांडे – शहरातील प्रसिद्ध ‘प्रकाश जनरल स्टोअर्स’चे मालक आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक अमित प्रकाश नारडिया (वय ४४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहरासह व्यापारी वर्तुळात आणि त्यांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर रोडवरील आपल्या निवासस्थानी सर्वात वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये अमित नारडिया […]

बुलढाणा प्रतिनिधी कुणाल देशपांडे – शहरातील प्रसिद्ध ‘प्रकाश जनरल स्टोअर्स’चे मालक आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक अमित प्रकाश नारडिया (वय ४४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहरासह व्यापारी वर्तुळात आणि त्यांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर रोडवरील आपल्या निवासस्थानी सर्वात वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये अमित नारडिया रात्री एकटेच झोपले होते. आज सकाळी बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने तसेच कुटुंबीयांनी वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने घरच्यांना संशय आला. अखेर त्यांचा धाकटा भाऊ आशिष यांनी बेडरूमची खिडकी तोडून आत प्रवेश केला असता, अमित हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर येताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. अमित नारडिया यांच्या पश्चात तीन मुले आणि मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

या घटनेपूर्वी अमित नारडिया यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. “विश्वास जास्त वजनदार असतो, तो कोणाच्या पण खांद्यावर ठेवायचा नसतो,” असे भावूक स्टेटस त्यांनी ठेवले होते. या स्टेटसचा त्यांच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का, या दृष्टीनेही आता तर्कवितर्क लढवले जात असून बुलढाणा शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/