Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • अहिल्यानगर व पाथर्डी येथे चैनस्नॅचिंग करणारी टोळी गजाआड
- क्राईम - महाराष्ट्र - विदर्भ

अहिल्यानगर व पाथर्डी येथे चैनस्नॅचिंग करणारी टोळी गजाआड

अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद , 4 गुन्हे उघडकीस 3 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त 1 नोहेंबर रोजी लिंक रोडकडुन गायके मळा जाणारे रोडवर दोन महिला स्कुटीवरुन जात असतांना त्यातील एका महिलेच्या गळयातील दागीने बळजबरीने हिसकावुन चोरून नेण्याच्या घटनेवरून कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी […]

अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद , 4 गुन्हे उघडकीस 3 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त
1 नोहेंबर रोजी लिंक रोडकडुन गायके मळा जाणारे रोडवर दोन महिला स्कुटीवरुन जात असतांना त्यातील एका महिलेच्या गळयातील दागीने बळजबरीने हिसकावुन चोरून नेण्याच्या घटनेवरून कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना आदेशित करून 21 नोव्हेंबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील चिखली येथील विनोद जिजाबा भोसले मी त्याच्या सहकार्यासह केला असल्याचे त्यास ताब्यात घेऊन सुमित नितीन चव्हाण केडगांव , अहिल्यानगर (फरार) , रोहित नितीन चव्हाण, केडगांव, अहिल्यानगर (फरार), शुभम गहिनीनाथ भोसले, बेलगांव, तालुका – कर्जत, जि. अहिल्यानगर (फरार), अशांनी मिळुन केल्याचे सांगितले. चोरी केलेला मुददेमाल हा अंबादास दगडु पांडुळे , चिखली , तालुका – आष्टी, जिल्हा – बीड यांस विक्रीसाठी दिल्याच्या सांगितलेल्या माहितीवरुन त्यांचा शोध घेवुन त्यांस ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 3 लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिनिधी – जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/