Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी विदर्भ राज्य निर्मितीचा संकल्प; ‘अभी नहीं तो कभी नहीं’ – विदर्भ राज्य आंदोलन समिती
- नागपूर - राजकारण - विदर्भ

३१ डिसेंबर २०२७ पूर्वी विदर्भ राज्य निर्मितीचा संकल्प; ‘अभी नहीं तो कभी नहीं’ – विदर्भ राज्य आंदोलन समिती

किशोर गडकरी, भंडारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘मिशन २०२७’ अंतर्गत ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील ११ जिल्हे व १२० तालुक्यांत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती करण्यात येणार असून, जिल्हावार व विभागवार ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प’ मेळावे आयोजित केले जात आहेत. याच अभियानांतर्गत २५ नोव्हेंबर २०२६ रोजी […]

किशोर गडकरी, भंडारा

विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘मिशन २०२७’ अंतर्गत ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील ११ जिल्हे व १२० तालुक्यांत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती करण्यात येणार असून, जिल्हावार व विभागवार ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प’ मेळावे आयोजित केले जात आहेत.

याच अभियानांतर्गत २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता यवतमाळ येथील सेलिब्रेशन सभागृह, दोन पंजा चौक येथे जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच ७ डिसेंबर २०२६ रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनावर ‘हल्लाबोल आंदोलन’ करण्याच्या तयारीबाबत भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत चर्चा करण्यात आली.

नागपूर करारातील आश्वासने, सिंचन व विकासाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योग व शिक्षण क्षेत्रातील असमतोल या मुद्द्यांचा उल्लेख करत स्वतंत्र विदर्भ हाच विकासाचा पर्याय असल्याचे समितीने म्हटले आहे. विदर्भातील नागरिक, युवक व विदर्भप्रेमींनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले.पत्रकार परिषद डॉ. रमेश गजबे, अध्यक्ष पूर्व विदर्भ यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी युवा आघाडी व विभागीय पदाधिकारी आणि समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/