Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांचे दिल्लीमध्ये निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा
- Breaking News - भारत - महाराष्ट्र - मुंबई - राजकारण

राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांचे दिल्लीमध्ये निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा

हृदयविकाराच्या झटक्याने एम्स रुग्णालयात घेतला  अखेरचा श्वास,  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून  शोक व्यक्त हिंगोली / दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांचे दिल्ली येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. छातीत दुखू लागल्याने आणि अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. रामरावजी वडकुते हे अनुभवी, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि विकासाभिमुख विचारांचे नेते म्हणून परिचित होते. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकास क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने एम्स रुग्णालयात घेतला  अखेरचा श्वास,  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून  शोक व्यक्त

हिंगोली / दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांचे दिल्ली येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. छातीत दुखू लागल्याने आणि अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. रामरावजी वडकुते हे अनुभवी, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि विकासाभिमुख विचारांचे नेते म्हणून परिचित होते. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकास क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/